KL Rahul Century : न्यू चंदीगडमध्ये केएल राहुलच वादळ! षटकार ठोकत दमदार शतक झळकावत पाडला धावांचा पाऊस
KL Rahul Century : या मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात केएल राहुलला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. मात्र, तिसऱ्या सामन्यात राहुलची पाळी आली आणि त्याने शतक झळकावले.

KL Rahul Scored 129 Runs Off 87 Balls India 351 IND vs WI 3rd ODI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत भारतीय आघाडीच्या फलंदाजांनीच वर्चस्व राखल्याने मधल्या फळीला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. मात्र, तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात मिळालेल्या संधीचे सोने करत केएल राहुलने (KL Rahul) मैदानात तुफानी नाबाद शतक झळकावले. राहुलच्या अवघ्या ८७ चेंडूंत १२९ धावांच्या स्फोटक खेळीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजसमोर ५० षटकांत ८ बाद ३५१ धावांचा भलामोठा डोंगर उभा केला.
३ धावांवर २ बाद! गिल अन् कोहली स्वस्तात माघारी, रोहित-ऋतुराजची सावरली नौका –
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. अवघ्या ३ धावांवर कर्णधार शुबमन गिल आणि विराट कोहली माघारी परतले. या कठीण परिस्थितीत रोहित शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी संयमी आणि आक्रमक भागीदारी रचून डाव सावरला. दोघांनी भक्कम पाया रचल्यानंतर मधल्या फळीत आलेल्या केएल राहुलने सामन्याची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली.
८० चेंडूंत नववे शतक; अखेरच्या षटकांत विंडीज गोलंदाजांची धुलाई!
🔟K International Runs with a SIX ✅
💯 with a SIX ✅🎥 Milestones reached in MAXIMUM style, ft. @klrahul 🚀
Updates ▶️ https://t.co/PhSJSbvW7C#TeamIndia | #INDvWI | @mflone_ pic.twitter.com/JXFr6SNbfj
— BCCI (@BCCI) October 3, 2026
डावाच्या २५ व्या षटकात फलंदाजीला आलेल्या राहुलने सुरुवातीला सावध पवित्रा घेत ४१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने गिअर बदलत गोलंदाजांवर चौफेर हल्ला चढवला. ४९ व्या षटकात डीप स्क्वेअर लेगवर उत्तुंग षटकार खेचत त्याने ८० चेंडूंत वनडे कारकिर्दीतील नववे शतक पूर्ण केले. त्याचबरोबर या वर्षातील त्याचे हे दुसरे शतक ठरले.
शेवटच्या २० चेंडूंत ५१ धावा; ८७ चेंडूंत १२९ धावांची सर्वोच्च खेळी!
The elegance 🤌
The milestone 💯
The celebration 🥳📸 Picture-perfect frames from a spectacular9️⃣th ODI hundred by @klrahul 💙#TeamIndia | #INDvWI | @mflone_ pic.twitter.com/x3XViPrHAn
— BCCI (@BCCI) October 3, 2026
भारताची ४५.४ षटकांत ७ बाद २९० अशी स्थिती असताना राहुल ७८ धावांवर खेळत होता. तिथून पुढे त्याने अखेरच्या २६ चेंडूंत गुरनूर ब्रारच्या साथीने ६१ धावांची आतषबाजी केली. गुरनूरने केवळ ८ धावांचे योगदान दिले, तर राहुलने एकट्याने अवघ्या २० चेंडूंत ५१ धावा कुटल्या. ५० व्या षटकात २२ धावा वसूल करत त्याने ८७ चेंडूंत १२९ धावांची एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या उभारली.





