Bhumika Chawla : भरकार्यक्रमात तेरे नाम फेम अभिनेत्रीला रडू कोसळलं; दिग्दर्शकाने दिला धीर, व्हिडीओ व्हायरल
Bhumika Chawla : अभिनेत्रीचा रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, चाहत्यांना चिंता वाटत आहे.

Bhumika Chawla : तेरा नाम चित्रपटाची क्रेझ इतकी होती की सलमान खान ( Salamn Khan) सारखं दिसण्याचा प्रयत्न केला जात असायचा. त्याच्या हेअरस्टाईलवर सगळेच फिदा झाले होते. खरंतर साऊथमध्ये तयार झालेल्या चित्रपटाचा सिक्वल तेरे नाम चित्रपट आहे. अधूनमधून चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याच्या चर्चा रंगत असतात. पण अजूनही याबाबत स्पष्टता नाही. तेरे नाममध्ये अभिनेत्री भूमिका चावलाच्या नीरजाने लक्ष वेधून घेतले. ती रातोरात स्टार झाली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले आहे.
नुकताच सोशल मीडियावर अभिनेत्रीचा (Bhumika Chawla) रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे चाहत्यांना चिंता वाटत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत भूमिका स्टेजवर उभी राहून रडताना दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
भूमिका चावलाचा (Bhumika Chawla ) तेलुगू चित्रपट ‘युफोरिया’ नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी हैदराबादमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थिती होती. व्हायरल झालेला भूमिकाचा रडतानाचा व्हिडीओ याच कार्यक्रमामधील आहे.
View this post on Instagram
स्टेजवरून कलाकारांनी या चित्रपटात काम करतानाचे अनुभव शेअर केले. भूमिका चावला हिने ‘युफोरिया’ चित्रपटातील पात्र, अनुभव आणि कथेबद्दल माहिती दिली. “हा चित्रपट पाहिल्यानंतर मी रात्रभर झोपू शकले नाही. यामुळे मी इमोशलन झाले. या चित्रपटातील माझी भूमिका आव्हानात्मक होती. या चित्रपटातील पात्र साकारत असताना रात्रीच्या वेळेस मी अचानक जागे व्हायची”, असे सांगत असतानाच भूमिकेला रडू कोसळलं.
यावेळी दिग्दर्शकाने भूमिकाचे सांत्वन केले. भूमिका अश्रू पुसताना कॅमेऱ्यात कैद झाली. तिचा इमोशनल झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला. युफोरिया हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून, चित्रपटाची कथा हैदराबादमध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारीत आहे. ज्यामध्ये लहान मुलांमध्ये ड्रग्ज व्यसन आणि लैंगिक शोषण यांसारख्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन गुणशेखर यांनी केले आहे.






