Rasha Thadani : राशाने आई रवीनाचे ९० च्या दशकातील जुने फोटो केले शेअर; दोन शब्दात दिलेल्या कॅप्शनने वेधले लक्ष
Rasha Thadani : अभिनेत्री रवीना टंडन हिची मुलगी राशाने इंन्स्टाग्रामवर पोस्टद्वारे आईचे जुने फोटो शेअर केले आहेत.

Rasha Thadani : प्रत्येक अभिनेत्रीचा एक सुवर्णकाळ असतो, त्या काळात त्या अभिनेत्रीचे एकामागोमाग एक चित्रपट ब्लॅाकबस्टर ठरतात. ९० च्या दशकात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना मोठी लोकप्रियता मिळाली.
त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन.(Raveena Tandon)तिने इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले. आजच्या चित्रपटांमध्ये देखील रवीना दिसते. पण त्या काळात तिने केलेले चित्रपट प्रेक्षकांच्या अतिशय आवडीचे समजले जातात.
तिची मुलगी राशा थडानी (Rasha Thadani) हिने आईच्या पाऊलावर पाऊल टाकत बॅालीवूडमध्ये पदार्पण केले आहे. नुकतेची राशाने इंन्स्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने आई रवीनाच्या ९० च्या दशकातील चित्रपटातील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर कमेंट्चा वर्षाव राशाच्या पोस्टवर नेटकरी करत आहेत. पोस्टमध्ये राशाने रवीनाचे सात जुने फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत तिने “आई.” असे छोटेसे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
रवीनाने तिच्या कारकीर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती तिच्या सौंदर्यासाठी, बहुढंगी अभिनयासाठी ओळखली जाते. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केले. “टिप टिप बरसा पानी” या गाण्यामुळे तिची लोकप्रियता खूप वाढली. रवीनाने १९९१ मध्ये “पत्थर के फूल” या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली. तिने १९९५ मध्ये अनिल थडानीशी लग्न केले.
तिने “मोहरा”, “लाडला”, “दिलवाले” आणि “अंदाज अपना अपना” यासारखे सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. रविनाने “अरण्यक” या २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या वेबसिरीजमधून ओटीटीवर पदार्पण केले. तिची मुलगी राशी थडानी देखील बॅालीवूडमध्ये जम बसवत असून, तिने अजय देवगणसोबत आझाद चित्रपटाद्वारे बॅालीवूडमध्ये पदार्पण केले आहे. आगामी काळात अनेक चित्रपटात राशी झळकणार आहे.





