Tennis | मानांकित खेळाडूवर नागलचा विजय
Updated On:

ब्युनोस आयर्स – भारताचा नवोदित परंतु अव्वल टेनिसपटू सुमीत नागल याने एटीपी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना चिलीचा जागतिक 22 वा मानांकित खेळाडू ख्रिस्तियन ग्रेन याच्यावर 6-4, 6-3 अशी दुसऱ्या फेरीच्या सामन्यात मात केली.
एटीपी कारकिर्दीतील भारतीय टेनिसपटूची उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. अर्जेन्टिना ओपन टेनिस स्पर्धेत नागलने ही कामगिरी केली.
एटीपी क्रमवारीत ग्रेन 22 व्या स्थानावर असून त्याच्याकडे भविष्यातील ग्रॅण्डस्लॅम विजेता म्हणून पाहिले जाते. त्याच्यावरच नागलने मात केल्याने हा स्पर्धेतील सर्वात धक्कादायक निकाल ठरला आहे.
नागल हा या क्रमवारीत 150 व्या स्थानावर आहे. आता उपउपांत्यपूर्व फेरीत नागलची लढत स्पेनच्या अल्बर्ट रामोस विनोलासशी होणार आहे.





