चार तासांची फेरी काढून बागवेंच्या प्रचाराची सांगता

पुणे कॅन्टोन्मेंट – तब्बल चार तास भर पावसात दुचाकी फेरी काढून कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता केली.
यावेळी मतदारसंघातील जनमत कॉंग्रेसच्या बाजूने असून मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा विश्वास बागवे व्यक्त केला. या फेरीत रमेश बागवे यांच्यासह माजी आमदार मोहन दादा जोशी, शरद रणपिसे, नगरसेवक अविनाश बागवे, सुजाता शेट्टी, लताताई राजगुरू, रफिक शेख, प्रशांत जगताप, चांदबी नदाफ, मेहबूब नदाफ, माजी नगरसेवक रजनी त्रिभुवन, संगीता तिवारी, मोहनसिग राजपाल, साहिल केदारी, विनोद मथुरावाला, प्रसाद केदारी, मंजूर शेख, राहुल डंबाळे, रशीद खिजर, सादिक लुकडे, प्रसाद केदारी, शिवाजी केदारी, आसिफ शेख, हसन कुरेशी, दीपक डोंगरे, फईम शेख, मुकेश धीवर, अजीम गुडाकूवाला, सुजित यादव, केविन मॅन्युअल यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे सर्व नेते व कार्यकर्ते मोट्या संख्येने उपस्थित होते.
वानवडीतील केदारी पेट्रोल पंपापासून सुरू झालेल्या रॅलीचा समारोप साडेचार वाजता भोपळे चौक येथे करण्यात आला. तब्बल साडेपाच तास जोरदार पाऊस सुरू असतानाही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. त्यानंतर भोपळे चौकात विजयी सभा घेत प्रचाराची सांगता करण्यात आली.
बागवे म्हणाले, ही विधानसभा निवडणूक वेगळी आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यातील जनता भाजपला कंटाळली असून सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रचार कालावधीमध्ये जनमत हे कॉंग्रेस पक्षाच्या बाजूने असून मागील पाच वर्षांमध्ये आमदारांनी केवळ भ्रष्टाचार केल्याने लोकांमध्ये भाजपबद्दल नाराजी असून कॉंग्रेसचा आमदार व मंत्री म्हणून 2009 ते 2014 दरम्यान केलेल्या कार्याबद्दल लोक समाधान व्यक्त करत असून पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्षालाच संधी देणार असल्याची भावना व्यक्त करत असल्याने यावेळी अधिक मताधिक्याने विजय होईल.





