नवी दिल्ली – देशातील दरडोई उत्पन्नाची राज्यनिहाय यादी केंद्र सरकारने जारी केली आहे. यात तेलंगणा राज्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे. वर्ष 2022-23 मध्ये तेलंगणातील व्यक्तीचे दरडोई उत्पन्न हे 3,08,732 रुपये इतके आहे. दुसऱ्या स्थानी कर्नाटक असून येथे दरडोई उत्पन्न 3,01,673 रुपये इतके आहे.
वर्ष 2022-23 या वर्षात महाराष्ट्रातील दरडोई उत्पन्न 2,42,247 रुपये इतके असल्याची माहिती समोर आली आहे. मागील आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये 2,15,233 इतके दरडोई उत्पन्न होते. तामिळूनाडूचे दरडोई उत्पन्न 2,73,288 रुपये इतके आहे. वर्ष 2021-22 मध्ये 2,41,131 रुपये इतके दरडोई उत्पन्न नोंदवण्यात आले होते.
17 राज्यांनी वर्ष 2022-23 मधील केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडे सोपवली नाही. यात गुजरात, बिहार, झारखंड, केरळसह अन्य राज्यांचा समावेश आहे. यामुळे त्या राज्यांचे दरडोई उत्पन्न स्पष्ट झाले नाही. ज्या राज्यांनी माहिती सादर केली आहे. त्या राज्यांचे दरडोई उत्पन्न मागील दोन वर्षांच्या तुलनेत वाढले आहे.
कोणत्या राज्याचे किती दरडोई उत्पन्न
राज्याचे नाव – 2020-21 – 2021-22 – 2022-23
आंध्र प्रदेश – 1,63,746 – 1,92,587 – 2,19,518
आसाम – 90,482 – 1,02,965 – 1,18,504
छत्तीसगड – 1,04,788 – 1,20,704 – 1,33,898
हरियाणा – 2,29,065 – 2,64,835 – 2,96,685
कर्नाटक – 2,21,310 – 2,65,623 – 3,01,673
मध्य प्रदेश – 1,03,654 – 1,21,594 – 1,40,583
महाराष्ट्र – 1,83,704 – 2,15,233 – 2,42,247
मेघालय – 84,638 – 90,638 – 98,572
ओडिशा – 1,02,166 – 1,28,873 – 1,50,676
पंजाब – 1,49,193 – 1,61,888 – 1,73,873
राजस्थान – 1,15,122 – 1,35,962 – 1,56,149
तामिळनाडू – 2,12,174 – 2,41,131 – 2,73,288
तेलंगणा – 2,25,687 – 2,65,942 – 3,08,732
उत्तराखंड – 1,84,002 – 2,11,657 – 2,33,565
पश्चिम बंगाल – 1,06,510 – 1,24,798 – 1,41,373
जम्मू-काश्मीर – 1,02,803 – 1,16,619 – 1,32,806