तेजश्री प्रधानचा वयाने 25 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्स, लंडनमध्ये शूट झालेल्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Tejashri Pradhan | अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने मालिकांसह चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. नुकताच तिच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यात ती वयाने तिच्याहून 25 वर्षांनी मोठ्या असलेल्या लोकप्रिय अभिनेते अजिंक्य देव यांच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
तेजश्री आणि अजिंक्य देव ‘आसा मी अशी मी’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात एक अनोखी प्रेमकहाणी दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट येत्या 28 नोव्हेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
‘आसा मी अशी मी’ या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये झाले आहे. या ट्रेलर मध्ये अभिनेते अजिंक्य रमेश देव एक भारतीय फोटोग्राफरच्या भूमिकेत आहेत. तर दुसरीकडे तेजश्री प्रधान एक परिपक्व, स्थिर आणि स्वतःच्या स्वप्नांनी भरलेली मुलगी म्हणून दिसते जी लंडनमध्ये स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी चालवते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. ट्रेलरमध्ये हि प्रेमकहाणी जिथे सुंदर उंची गाठते, तिथेच एक अनपेक्षित वळण दिसतं. तेजश्री अचानक अजिंक्यपासून दूर जाताना दिसते. या निर्णयामागचं कारण काय? हे चित्रपटात उत्सुकता निर्माण करणारे आहे. Tejashri Pradhan |
अमोल शेटगे दिग्दर्शित या चित्रपटात अजिंक्य रमेश देव आणि तेजश्री प्रधान यांच्यासोबत अनेक भारतीय आणि ब्रिटिश कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. यासोबतच माधव देवचके, संजय मोने, कृष्णकांत जगन्नाथ केणी आणि यशश्री मसुरकर हे कलाकारही चित्रपटात झळकणार आहेत. Tejashri Pradhan |
हेही वाचा:
सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारच्या निवडणूक आरक्षणावरील भूमिकेवर नाराजी; कोर्टात नेमकं काय घडलं?




