Tejashri Pradhan: “ज्यांना खूश करण्यात तुम्ही कित्येक वर्षं घालवली…” तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत

Tejashri Pradhan: मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. ती सध्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या लोकप्रिय मालिकेत स्वानंदी ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.
तेजश्री सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा नवा लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये तिचे कुरळे केस आणि साधा, आकर्षक लूक दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना तेजश्रीने एक भावनिक आणि विचार करायला लावणारी पोस्ट लिहिली आहे. ती म्हणते, “एक दिवस तुम्हाला जाणीव होईल की, ज्यांना खूश करण्यात तुम्ही कित्येक वर्षं घालवली, ते तुम्हाला ओळखतही नाहीत. पृथ्वीवरची तुमची वेळ मर्यादित आहे.” पुढे तिने असंही लिहिलं की, “म्हणून समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यापेक्षा स्वतःच्या इच्छा आणि स्वप्नं पूर्ण करा.”
View this post on Instagram
तेजश्रीच्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या लूकचं आणि विचारांचं कौतुक केलं आहे. एका चाहत्याने लिहिलं, “तुझा कोणताही लूक छानच दिसतो.” दुसऱ्याने म्हटलं, “खूप गोड दिसतेस.” तर आणखी एकाने, “ज्या नावातच तेज आणि श्री आहे, ती व्यक्ती तेजस्वीच असणार.”
ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीही “तू खूप सुंदर दिसतेस” अशी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. तर अभिनेते जयवंत वाडकर यांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
तेजश्री सध्या मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज अशा विविध प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत तिच्यासोबत सुबोध भावे प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. समर आणि स्वानंदी या भूमिकांमधून हे दोघे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.





