Krantijyoti Vidyalaya Marathi Medium Movie Trailer : दिग्दर्शक, अभिनेता हेंमत ढोमे हा नेहमीच हटके विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘झिम्मा’, ‘फर्स्टक्लास दाभाडे’ यांसारख्या चित्रपटातून तुमच्या आमच्या जगण्यातून पैलूंवर भाष्य केले. आता पुन्हा एकदा हेंमत ढोमे त्याच्या पुढचा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे नाव ‘क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम’ असे आहे. नुकताच चित्रपटाचा मनोरंजक टीझर प्रदर्शित झाला आहे. मुलांना इंग्रजी माध्यमात शिकण्यासाठी पाठवण्याकडे पालकांचा कल आहे. एककाळ असा होता ज्यावेळी मराठी माध्यमातील शाळा म्हणजे खऱ्या शाळा, असे म्हटले जात होते. पण आत्ताची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. या चित्रपटाची कथा यावरच भाष्य करत मराठी माध्यमातील शाळेतील आठवणींना उजाळा देणारी आहे. मराठी शाळांच्या अस्तित्वाच्या लढ्याला अधोरेखित करणारी कथा चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसते. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षागृहात आपले मनोरंजन करणार यावर टीझरने शिक्कामोर्तब केल्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मराठी शाळा बंद होण्याच्या संकटात सापडली असताना, जुने विद्यार्थी अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र येत शाळेला भेट देतात. या भेटीत त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या होतात. शाळेप्रती त्यांचे असलेले प्रेम, मैत्रिचे नाते असे नितांत सुंदर आठवणींचा मागोवा घेतला जातो. कथा तशी २००४ च्या बॅचची असली तरी ती आपल्याला आपलीच असल्यासारखी भासते. या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळत आहे. अभिनेते सचिन खेडेकर यांच्या वाट्याला प्राध्यापकाची भूमिका आलेली आहे. याशिवाय अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर कलाकारांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या मराठी चित्रपटात पहिल्यांदाच प्राजक्ता कोळी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमेंने चित्रपटाचा टीझर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. View this post on Instagram A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) प्रत्येकाला आपली शाळा आठवणार, आता मराठी शाळा पुन्हा भरणार…सादर आहे आपल्या चित्रपटाचा टीझर!‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ १ जानेवारी २०२६ पासून प्रवेश सुरू…असे कॅप्शन देत हेंमतने टीझर शेअर केला आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रतिक्रिया समोर येत असून, टीझरला प्रेक्षक पसंती दर्शवताना दिसत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच १ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हेही वाचा : गृह मंत्रालयाने चंदीगड विधेयकावर सोडले मौन ; विधेयकाविषयी दिली ‘ही’ माहिती