The Family Man Season 3 Trailer : अभिनेता मनोज बाजपेयीची मुख्य भूमिका असलेली बहुप्रतिक्षित वेबसिरीज द फॅमिली मॅन ३ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. वेबसिरीजमध्ये मनोज बाजपेयी गुप्तहेर श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत पुन्हा परतला असून, नव्या सीझनमध्ये काही नव्या कलाकारांची देखील एन्ट्री झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या वेबसिरीजची बरीच चर्चा होती होती. नुकताच या वेबसिरीजमधील एक फनी व्हिडीओ देखील प्रदर्शित करण्यात आला होता. अमेझॉन प्राइम या ओटीटीवर रिलीज होणाऱ्या या सिरीजचा ट्रेलर २ मिनिटे ४९ सेकंदांचा असून, ट्रेलरची सुरुवात श्रीकांतने त्याच्या कुटुंबाला तो एक गुप्तहेर असल्याचे सांगून केली आहे. यानंतर पुढे श्रीकांतला वॉन्टेड घोषित करण्यात येते. त्याला अटक करण्यास सांगितले आहे. यानंतर त्याच्या खाजगी जीवनात मोठं वादळ येते. त्यामुळे श्रीकांत कुटुंबासह पळून जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा मित्र जेके त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो, अशी सर्वसाधारण कथा वेबसिरीजची असल्याचे ट्रेलर पाहून समजते. पण श्रीकांत नेमक्या कोणत्या चक्रव्यूहात अडकला आहे, यासाठी २१ नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे. ट्रेलरमध्ये निमरत कौर खास भूमिकेत दिसत असून अभिनेता जयदीप अहलावात एका ड्रग्ज तस्कराच्या भूमिकेत दिसत आहे. या वेबसिरीजच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले असून आता तिसरा सीझन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. राज आणि डीके यांनी द फॅमिली मॅन सीझन ३ चे दिग्दर्शन केले आहे. यावेळी सुमन कुमार आणि तुषार सेठ हे देखील त्यांच्यासोबत दिग्दर्शनात सहभागी होत आहेत. ‘फॅमिली मॅन’ सीझन ३ चा प्रीमियर २१ नोव्हेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम करण्यात येणार आहे. हेही वाचा : देशभरातील SIR विरुद्धच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात ‘या’ दिवशी होणार सुनावणी