Team India Record : टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड! झिम्बाब्वेला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा जगातील पहिलाच संघ
Team India Record : भारताने टी-२० मध्ये चार वेळा २५०+ धावा करणारा पहिला संघ बनून इतिहास रचला.

Team India Record 4th time 250 plus score in T20I : भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात ४६ धावांनी विजय मिळवत केवळ मालिकाच जिंकली नाही, तर क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये एक ऐतिहासिक जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. ३१ जानेवारी रोजी तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने २७१ धावांचा डोंगर उभारत न्यूझीलंडचा धुव्वा उडवला.
टीम इंडियाने मोडला झिम्बाब्वेचा विक्रम –
या सामन्यात भारताने २७१ धावा केल्या आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त वेळा २५० पेक्षा जास्त धावा करण्याचा मान मिळवला. भारताने आतापर्यंत एकूण ४ वेळा २५० पेक्षा जास्त धावांचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी झिम्बाब्वेने ३ वेळा अशी कामगिरी केली होती, परंतु आता भारत या यादीत जगात अव्वल स्थानी पोहोचला आहे.
टी-२० मध्ये सर्वाधिक वेळा २५०+ धावा करणारे संघ:
𝗪.𝗜.𝗡.𝗡.𝗘.𝗥.𝗦 🏆#TeamIndia win the @IDFCFIRSTBank T20I series 4⃣-1⃣ 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/AwZfWUTBGi#INDvNZ pic.twitter.com/4wCu4e6pPI
— BCCI (@BCCI) January 31, 2026
भारत: ४ वेळा
झिम्बाब्वे: ३ वेळा
इंग्लंड: २ वेळा
वेस्ट इंडिज: २ वेळा
इशान-सूर्याचे तुफान; धावफलकावर २७१ धावा!
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी किवी गोलंदाजांची पिसे काढली. यष्टीरक्षक फलंदाज इशानने अवघ्या ४३ चेंडूत १०३ धावांचे स्फोटक शतक ठोकले. कर्णधार सूर्याने अवघ्या ३० चेंडूत ६१ धावांची वादळी खेळी केली. या दोघांच्या जोरावर भारताने २० षटकांत ५ बाद २७१ ही महाकाय धावसंख्या उभारली.
भारताने टी-२० मध्ये चार वेळा २५०+ धावा करणारा पहिला संघ बनून इतिहास रचला.
भारताचे टी-२० मधील सर्वोच्च धावसंख्या:
| विरुद्ध | धावसंख्या | ठिकाण | तारीख |
| बांगलादेश | २९७/६ | हैदराबाद | १२ ऑक्टोबर, २०२४ |
| दक्षिण आफ्रिका | २८३/१ | जोहान्सबर्ग | १५ नोव्हेंबर, २०२४ |
| न्यूझीलंड | २७१/५ | तिरुवनंतपुरम | ३१ जानेवारी, २०२६ |
| श्रीलंका | २६०/५ | इंदूर | २२ डिसेंबर, २०१७ |
न्यूझीलंडचा लढा अपयशी; अर्शदीपचा विकेट्सचा ‘पंजा’ –
प्रत्युत्तरात २७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फिन ॲलनने ३८ चेंडूत ८० धावा (८ चौकार, ६ षटकार) करत कडवी झुंज दिली. मात्र, अर्शदीप सिंगने भेदक गोलंदाजीच्या जोरावर ५ विकेट्स घेत न्यूझीलंडचा डाव १९.४ षटकांत २२५ धावांवर गुंडाळला. भारताने हा सामना ४६ धावांनी जिंकून मालिका ४-१ ने आपल्या नावे केली.





