Suryakumar Yadav Record : सूर्याचा वर्ल्ड रेकॉर्ड! टी-२० क्रिकेटमध्ये ‘विराट-रोहित’ला मागे टाकत ‘हा’ पराक्रम जगातील पहिलाच खेळाडू
Suryakumar Yadav Record : सूर्यकुमार यादव टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वात कमी चेंडूत ३००० धावांचा पराक्रम करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

Suryakumar Yadav Record Fastest 3000 T20I Runs : भारतीय टी-२० संघाचा कर्णधार आणि ‘मिस्टर ३६०’ सूर्यकुमार यादव याने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या सामन्यात इतिहास रचला आहे. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर सूर्याने आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ३००० धावा पूर्ण केल्या. विशेष म्हणजे, ही कामगिरी त्याने सर्वात कमी चेंडूंमध्ये पूर्ण करून एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
सर्वात जलद ३००० धावांचा विक्रम –
सूर्यकुमार यादवने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ १८२२ चेंडू घेतले. यासह तो या फॉरमॅटमध्ये सर्वात कमी चेंडूत हा पराक्रम करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने या शर्यतीत जोस बटलर, डेव्हिड वॉर्नर आणि विराट कोहली सारख्या दिग्गजांना खूप मागे टाकले आहे.
सर्वात कमी चेंडूत ३००० टी-२० धावा करणारे खेळाडू:
सूर्यकुमार यादवने सर्वात जलद 3000 T20I धावांचा विश्वविक्रम केला
१. सूर्यकुमार यादव (भारत): १८२२ चेंडू
२. मुहम्मद वसीम (UAE): १९४७ चेंडू
३. जोस बटलर (इंग्लंड): २०६८ चेंडू
४. आरोन फिंच (ऑस्ट्रेलिया): २०७७ चेंडू
५. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया): २११३ चेंडू
विराट-रोहितच्या ‘एलिट क्लब’मध्ये एन्ट्री –
Trivandrum treated with a SKY special 🎇
FIFTY up for the #TeamIndia Captain 🫡
Updates ▶️ https://t.co/AwZfWUTBGi#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/GfYMJXa8G0
— BCCI (@BCCI) January 31, 2026
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३००० धावांचा टप्पा ओलांडणारा सूर्यकुमार यादव हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी केवळ विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाच ही किमया साधता आली आहे. रोहितला ३००० धावांसाठी २१४९ चेंडू लागले होते, तर विराटला २१६९ चेंडूंचा सामना करावा लागला होता.
भारताने न्यूझीलंडविरुद्ध रचला इतिहास –
या सामन्यात भारतीय संघाने तिसरी सर्वोच्च धावसंख्या रचला. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्ध हा भारताची सर्वोच्च धावसंख्या आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ गडी गमावून २७१ धावा केल्या.१२ ऑक्टोबर २०२४ रोजी हैदराबाद येथे बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाने ६ बाद २९७ धावा केल्या होत्या. दुसरीकडे, १५ नोव्हेंबर २०२४ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १ गडी गमावून २८३ धावा केल्या होत्या. आजच्या सामन्यात भारतीय संघाने ५ गडी गमावून २७१ धावा केल्या. पूर्ण सदस्य संघांमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३०४ धावा केल्या होत्या.
सूर्याची आतापर्यंतची कारकीर्द –
न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात सूर्याने ६३ धावांची शानदार खेळी केली. आता त्याच्या नावावर १०४ सामन्यांच्या ९८ डावांत ३०३० धावा जमा आहेत. त्याचा स्ट्राईक रेट १६४ पेक्षा जास्त असून त्याच्या खात्यात ४ शतके आणि २४ अर्धशतके आहेत. जगात आतापर्यंत केवळ ११ फलंदाजांना ३००० धावांचा टप्पा पार करता आला आहे.





