Indian Cricketers : मैदानात उतरण्यापूर्वी टीम इंडिया ‘देवाच्या’ चरणी! पद्मनाभस्वामी मंदिरात खेळाडूंनी घेतलं दर्शन, पाहा VIDEO
Indian Cricketers : कर्णधार सूर्यकुमार यादवसह सात खेळाडूंनी जगप्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट देऊन पूजा-अर्चना केली.

Indian Cricketers visit Padmanabhaswamy Temple : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना शनिवारी होणार आहे. हा सामना केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनी आध्यात्मिक शांततेचा अनुभव घेतला. शुक्रवारी सकाळी कर्णधार सूर्यकुमार यादवसह सात खेळाडूंनी जगप्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट देऊन पूजा-अर्चना केली.
पारंपारिक वेशभूषेत खेळाडूंनी घेतले दर्शन –
शुक्रवारी सकाळी ९:१५ च्या सुमारास भारतीय खेळाडूंचे मंदिर परिसरात आगमन झाले. यावेळी खेळाडूंनी मंदिराच्या नियमानुसार पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती. कर्णधार सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवी बिश्नोई आणि फिल्डिंग कोच टी. दिलीप यांनी श्री पद्मनाभस्वामींचे दर्शन घेतले. सुमारे ३० मिनिटे खेळाडू मंदिर परिसरात होते. या पवित्र स्थानी त्यांनी मालिकेतील विजयासाठी आणि चांगल्या कामगिरीसाठी प्रार्थना केली.
सॅमसनचे घरच्या मैदानावर ऐतिहासिक पदार्पण –
इंडियन टी20 क्रिकेट टीम के कप्तान सूर्यकुमार यादव के नेतृत्व में वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव और रिंकू सिंह समेत कई खिलाड़ी तिरुवनंतपुरम के श्री पद्मनाभस्वामी मंदिर में दर्शन करने पहुंचे.#t20worldcup #suryakumaryadav #teamindia #aajtakradio pic.twitter.com/oMD46xrjWG
— Aaj Tak Radio (@aajtakradio) January 30, 2026
या सामन्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे केरळचा सुपुत्र संजू सॅमसन. संजू पहिल्यांदाच भारतीय जर्सीमध्ये आपल्या घरच्या मैदानावर (तिरुवनंतपुरम) आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. विमानतळावर दाखल होताच चाहत्यांनी संजूच्या नावाने घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी कर्णधार सूर्याने संजूला ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली. चाहत्यांना उद्देशून “आमच्या चेताला (मोठ्या भावाला) डिस्टर्ब करू नका,” असे म्हणत सूर्याने संजूला पुढे जाण्यासाठी वाट करून दिली.
संजूसाठी ‘अग्निपरीक्षा’; सर्वांच्या नजरा फॉर्मवर –
भारतीय क्रिकेटपटूंनी पद्मनाभस्वामी मंदिर पूजा केली
भलेही संजूचे स्वागत जंगी झाले असले, तरी त्याच्या फॉर्मबाबत चिंतेचे वातावरण आहे. मालिकेतील पहिल्या चार सामन्यांत संजूला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. मागील चार सामन्यांतील त्याची धावसंख्या १०, ६, ० आणि २४ अशी राहिली आहे. चौथ्या सामन्यात संजूने चांगली सुरुवात केली होती, पण मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात तो अपयशी ठरला. टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या पार्श्वभूमीवर पाचव्या सामन्यातील संजूची कामगिरी त्याचे भवितव्य ठरवू शकते.





