मैदानावर उतरण्यापूर्वीच Team India चे वाघ शिकारीसाठी सज्ज! नागपूरच्या जंगलात सूर्यकुमारसह ‘या’ खेळाडूंनी ठोकला मुक्काम

Team India Safari in Nagpur Tiger Reserve forest : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका संपल्यानंतर आता सर्वांचे लक्ष टी-२० मालिकेकडे आहे. ही मालिका २१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळवला जाणार असून, यासाठी भारतीय संघातील ‘टी-२० स्पेशलिस्ट’ खेळाडू आधीच नागपुरात दाखल झाले आहेत. सरावातून वेळ मिळताच टीम इंडियाच्या या खेळाडूंनी नागपूरच्या प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पांना भेट देऊन वाघांचे दर्शन घेतले.
‘टायगर कॅपिटल’मध्ये खेळाडूंचा मुक्काम –
नागपूरला भारताची ‘व्याघ्र राजधानी’ (Tiger Capital) मानले जाते, कारण या शहराच्या परिसरात अर्धा डझनहून अधिक व्याघ्र प्रकल्प आहेत. टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सॅमसन, रवी बिश्नोई आणि रिंकू सिंग या खेळाडूंनी जंगल सफारीचा आनंद लुटला. हे खेळाडू केवळ जीपमधून फिरले नाहीत, तर त्यांनी रात्रीच्या वेळी जंगलात डेरा जमावल्याचेही पाहायला मिळाले. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्यानंतर आता हे खेळाडू मैदानात किवींच्या शिकारीसाठी सज्ज झाले आहेत.
Team India’s Jungle Safari and camping before T20I series 🔥#IshanKishan #INDvsNZ pic.twitter.com/9186tpleaS
— Ayush Cricket (@AyushCricket32) January 19, 2026
भारत-न्यूझीलंड टी-२० मालिकेचे वेळापत्रक:
५ सामन्यांची ही थरारक मालिका खालीलप्रमाणे खेळवली जाईल:
- २१ जानेवारी: पहिला टी-२०, नागपूर
- २३ जानेवारी: दुसरा टी-२०, रायपूर
- २५ जानेवारी: तिसरा टी-२०, गुवाहाटी
- २८ जानेवारी: चौथा टी-२०, विशाखापट्टनम (वाईझॅग)
- ३१ जानेवारी: पाचवा टी-२०, तिरुवनंतपुरम
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर (फक्त पहिल्या तीन टी-२०साठी), अभिषेक शर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, इशान किशन, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवती, वरुण चक्रवर्ती (शेवटच्या दोन सामन्यांसाठी).





