\n

सूर्यकुमार यादव चार चेंडूत दोन धावा करून बाद झाला. त्याला बेंजामिन व्हाईटने बाद केले. त्यापूर्वी भारताला पहिला धक्का तिसऱ्या षटकात 22 धावांवर बसला. मार्क एडेअरने विराट कोहलीला बेंजामिन व्हाईटकरवी झेलबाद केले. विराटला एक धाव करता आली. विराट अन् रोहित हे दोघेही जवळपास दोन वर्षांनंतर टी-20 मध्ये सलामीला आले. मात्र, ही रणनीती पहिल्याच सामन्यात फ्लॉप ठरली. आता भारतीय संघ अ गटात दोन गुणांसह अव्वल स्थानावर आला आहे. त्याचा पुढचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 9 जून रोजी होणार आहे.

\n

तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर भारताविरुद्धच्या सामन्यात प्रथम खेळताना आयर्लंडचा संपूर्ण संघ 16 षटकात 96 धावांत गडगडला. आयरिश संघाचे केवळ 4 फलंदाज दुहेरी आकडा ओलांडू शकले आणि उर्वरित 7 फलंदाजांनी आपल्या फलंदाजीने 10 धावाही केल्या नाहीत. आयर्लंडकडून सर्वाधिक धावा गॅरेथ डेलेनीने केल्या, ज्याने 14 चेंडूत 26 धावा केल्या.

\n
\n

Innings Break!

\n

Cracking bowling display from #TeamIndia! ⚡️ ⚡️

\n

3⃣ wickets for vice-captain @hardikpandya7
\n2⃣ wickets each for @Jaspritbumrah93 & @arshdeepsinghh
\n1⃣ wicket each for @akshar2026 & @mdsirajofficial

\n

Stay Tuned for the India chase! ⌛️

\n

Scorecard ▶️… pic.twitter.com/oNQvgst1pg

\n

— BCCI (@BCCI) June 5, 2024

\n

\n

आयर्लंडची सुरुवात इतकी खराब झाली की पहिल्या 3 षटकांतच संघाने सुरुवातीच्या दोन्ही फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या. कर्णधार पॉल स्टर्लिंग 2 धावा करून बाद झाला आणि अँड्र्यू बार्लबर्नीलाही केवळ 5 धावा करता आल्या. अर्शदीप सिंगने या दोन्ही फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पॉवरप्ले ओव्हर्समध्ये आयर्लंडचा स्कोअर 2 गडी गमावून 26 रन्स होता. लॉर्कन टकर चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि 10 धावा केल्यानंतर क्रीजवर सेट झाला होता, पण हार्दिक पांड्याने त्याला 7 व्या षटकात क्लीन बोल्ड केले. हॅरी टेक्टरची बॅटही शांत राहिली, त्याला 16 चेंडू खेळून केवळ 4 धावा करता आल्या.

\n

परिस्थिती अशी होती की डावाच्या पहिल्या 61 चेंडूतच संघाने 7 विकेट गमावल्या होत्या आणि स्कोअरबोर्डवर केवळ 49 धावा झाल्या होत्या. 12व्या षटकात आयर्लंडने 50 धावांचा टप्पा गाठला, मात्र त्याच षटकात अक्षर पटेलने बॅरी मॅकार्थीची विकेट घेतली. दरम्यान, जोशुआ लिटल आणि गॅरेथ डेलेनी यांच्यात 27 धावांची छोटी पण महत्त्वाची भागीदारी झाली, मात्र 14 धावांच्या स्कोअरवर लिटल बुमराहच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. आयर्लंडने 15 षटकांपर्यंत 79 धावापर्यंत मजल मारली होती आणि फक्त एक विकेट शिल्लक होती. अखेरीस, 16व्या षटकात गॅरेथ डेलेनी धावबाद झाल्याने आयर्लंडचा डाव 96 धावांवर आटोपला. शेवटच्या 2 विकेट्समध्ये आयर्लंडने एकूण 46 धावा केल्या.

\n

T20 World Cup 2024 : भारत-पाक सामन्याचं तिकिट Online कसं बुक करायचं? येथे जाणून घ्या, Step-by-Step संपूर्ण माहिती…

\n

\n

भारतीय गोलंदाजांचा कहर

\n

भारतीय गोलंदाजीबदल बोलायचे झाले तर पहिल्याच षटकापासून भारतीय गोलंदाजांनी धुमाकूळ घातला आणि उपकर्णधार हार्दिक पंड्याने सर्वाधिक विकेट घेतल्या. हार्दिकने एकूण 3 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन बळी घेत आयर्लंडला मोठी धावसंख्या बनवण्यापासून वंचित ठेवले. मोहम्मद सिराज आणि अक्षर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

\n

T20 World Cup 2024 : अमेरिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का…

\n

\n

आयर्लंडची दुसरी सर्वात कमी धावसंख्या….

\n

टी-20 विश्वचषकात आयर्लंडची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी 2010 च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध आयरिश संघ अवघ्या 68 धावांवर ऑलआऊट झाला होता. आता 96 ही त्याची टी-20 विश्वचषकातील दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. आयर्लंड हा चौथा संघ बनला आहे ज्याला भारताने टी-20 विश्वचषकात 100 धावसंख्येच्या आत रोखले आहे. याआधी भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि स्कॉटलंडला 100 धावसंख्येच्या आत रोखले आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"T20 World Cup 2024 : टीम इंडियाची विजयी सुरुवात, आयर्लंडचा 8 गडी राखून केला पराभव…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/06/roit.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/team-india-defeated-ireland-in-the-first-match-of-the-world-cup-2024#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/06/roit.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/team-india-defeated-ireland-in-the-first-match-of-the-world-cup-2024#webpage","name":"T20 World Cup 2024 : टीम इंडियाची विजयी सुरुवात, आयर्लंडचा 8 गडी राखून केला पराभव…","url":"https://www.dainikprabhat.com/team-india-defeated-ireland-in-the-first-match-of-the-world-cup-2024","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/team-india-defeated-ireland-in-the-first-match-of-the-world-cup-2024#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/06/roit.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/team-india-defeated-ireland-in-the-first-match-of-the-world-cup-2024#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/team-india-defeated-ireland-in-the-first-match-of-the-world-cup-2024","name":"T20 World Cup 2024 : टीम इंडियाची विजयी सुरुवात, आयर्लंडचा 8 गडी राखून केला पराभव…"}}]}}}

T20 World Cup 2024 : टीम इंडियाची विजयी सुरुवात, आयर्लंडचा 8 गडी राखून केला पराभव…