T20 World Cup 2024 : अमेरिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का…

T20 World Cup 2024 : पाकिस्तानला टी-20 विश्वचषकात आपल्या मोहिमेची सुरुवात सह-यजमान अमेरिकेविरुद्ध करायची आहे, मात्र त्याआधीच संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा डावखुरा फिरकी गोलंदाज इमाद वसीम 6 जून रोजी डलास येथे होणाऱ्या या सामन्यात खेळू शकणार नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सांगितले की, वसीम दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर असेल.
यूएसए विरुद्धच्या सामन्यापूर्वी पीसीबीने सांगितले की, इमाद वसीम गुरुवारच्या यूएसए विरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही कारण त्याला बोर्डाच्या वैद्यकीय पथकाने विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
इंग्लंड दौऱ्यात इमादला झाली होती दुखापत…
टी-20 विश्वचषकापूर्वी इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या चार सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यापूर्वी नेटमध्ये फलंदाजी करताना इमादला दुखापत झाली होती. याच कारणामुळे इमाद लंडनमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यातही सहभागी झाला नव्हता. इमादच्या बाबतीत पाकिस्तान खबरदारी घेत असून तो रविवारी न्यूयॉर्कमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकतो, अशी अपेक्षा आहे.
पाकिस्तानकडे अनेक पर्याय उपलब्ध…
इमाद अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात सहभागी होऊ शकणार नसला तरी फिरकी गोलंदाजीमध्ये पाकिस्तानकडे अनेक पर्याय आहेत. संघात लेगस्पिनर शादाब खान आणि ऑफस्पिनर अबरार अहमदसारखे गोलंदाज आहेत. भारत, कॅनडा, अमेरिका आणि आयर्लंडसह पाकिस्तानचा संघ अ गटात आहे.
भारत, कॅनडा, अमेरिका आणि आयर्लंडसह पाकिस्तानचा संघ अ गटात आहे. पाकिस्तानला सह यजमान अमेरिकेविरुद्ध टी-20 विश्वचषकात आपल्या मोहिमेची सुरुवात करायची आहे.





