IND vs IRE : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस! नवख्या आयर्लंडने टीम इंडियाला दिला ‘क्लीन स्वीप’
IND vs IRE : क्रिकेटच्या इतिहासात आयर्लंडने भारताला मालिकेत पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

IND vs IRE T20 Series Belfast Ireland Clean Sweep to India : भारतीय क्रिकेट संघासाठी आयर्लंड दौरा हा ऐतिहासिक पराभवाचा आणि अत्यंत मानहानीकारक ठरला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात धक्कादायक पराभव पत्करावा लागल्यानंतर, दुसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यातही आयर्लंडने भारताचा १ धावेने पराभव केला. या थरारक विजयासह आयर्लंडने दोन सामन्यांच्या मालिकेत भारताला २-० असा ‘क्लीन स्वीप’ दिला आहे. क्रिकेटच्या इतिहासात आयर्लंडने भारताला मालिकेत पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. टीम इंडियावर तब्बल ७ वर्षांनंतर टी-२० मालिकेत क्लीन स्वीप होण्याची नामुष्की ओढावली आहे.
प्रिन्स यादवचं शानदार पदार्पण; आयर्लंडला १५४ धावांवर रोखलं
भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयर्लंडने २० षटकांत ८ बाद १५४ धावांचा आव्हानात्मक स्कोअर उभारला. त्यांच्याकडून हॅरी टेक्टरने ४७ चेंडूंत ५३ धावांची संयमी खेळी केली, तर बेंजामिन कॅलिट्जने ३७ धावांचे योगदान दिले. भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या प्रिन्स यादवने ४ षटकांत २२ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच अर्शदीप सिंग आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर हर्षित राणाला १ विकेट्स मिळाली.
A thrilling finish saw Ireland complete a stunning 2-0 T20I series triumph over reigning Men’s #T20WorldCup champions India 🤩
📝: https://t.co/4ioMZJrw2N pic.twitter.com/PAw6icT5Zu
— ICC (@ICC) June 28, 2026
पहिल्याच षटकात दोन ‘गोल्डन डक’; भारतीय फलंदाजी पुन्हा कोलमडली –
𝐈𝐫𝐞𝐥𝐚𝐧𝐝 𝐯𝐬 𝐈𝐧𝐝𝐢𝐚, 𝟐𝐧𝐝 𝐓𝟐𝟎𝐈 🚨𝐑𝐄𝐒𝐔𝐋𝐓🚨
🏏Ireland win the2️⃣nd T20I against India by 1 run to clinch the series.
𝐅𝐢𝐧𝐚𝐥 𝐒𝐜𝐨𝐫𝐞:
IRE: 154/8 (20)
IND: 153/9 (20)📍Belfast#T20I #Cricket #TeamIndia #IREvIND pic.twitter.com/9PbJy29R34
— All India Radio News (@airnewsalerts) June 28, 2026
प्रत्युत्तरात १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत लाजिरवाणी झाली. आयर्लंडच्या जय मुंदडाने पहिल्याच षटकात भारताला दोन मोठे झटके दिले. सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा हे दोघेही प्रत्येकी पहिल्याच चेंडूवर (गोल्डन डक) बाद झाले. यानंतर श्रेयस अय्यर (१०) आणि इशान किशन (१२) झटपट बाद झाल्याने पॉवरप्लेमध्ये भारताची अवस्था ४ बाद ४१ अशी झाली होती.यानंतर तिलक वर्माने ४६ चेंडूंत ५५ धावा करत एक बाजू लावून धरली आणि अर्धशतक ठोकले, तर शिवम दुबेने २० धावा केल्या. मात्र, ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्याने सामना शेवटच्या षटकातपर्यंत पोहोचला.
शेवटच्या ओव्हरचा थरार; पहिल्याच चेंडूवर षटकार तरीही पराभव –
Jai Moondra wrecked India again with his new-ball spell, as the visitors are struggling at 54/4 after 9 overs, with the players currently off the field due to rain.#IREvIND #TeamIndia #Ireland pic.twitter.com/HbfBudG89y
— Circle of Cricket (@circleofcricket) June 28, 2026
भारताला विजयासाठी शेवटच्या ६ चेंडूंत २२ धावांची गरज होती. हर्षित राणाने १० चेंडूंत २१ धावा करत सामन्यात रंगत आणली, पण तो पाचव्या चेंडूवर बाद झाला. आता शेवटच्या चेंडूवर भारताला विजयासाठी ८ धावा हव्या होत्या (जे अशक्य होते). पदार्पण करणाऱ्या प्रिन्स यादवने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपल्या पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार ठोकला; मात्र तरीही भारतीय संघ अवघ्या १ धावेने मागे पडला. भारताचा डाव २० षटकांत ९ बाद १५३ धावांवर संपला. यापूर्वी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला मायदेशात २-० ने क्लीन्सवीप केले होते.





