Team India Record : टीम इंडियाची ऐतिहासिक ‘सेंच्युरी’! आशियात जे कोणालाच जमलं नाही, ते मायदेशात करून दाखवलं
Team India Record : टीम इंडिया मायदेशात सर्वाधिक १०० टी-२० सामने खेळणारा पहिला आशियाई संघ ठरला असून जगातील तिसरा संघ आहे.

Team India Record 100 home T20I matches : टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मैदानात पाऊल टाकताच एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मायदेशात १०० सामने खेळणारा भारत हा आशियातील पहिला आणि जगातील तिसरा संघ ठरला आहे. या विक्रमासह भारताने क्रिकेट विश्वात आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.
हा पराक्रम करणारा आशियातील पहिला संघ –
आजवर आशियातील कोणत्याही देशाला (पाकिस्तान, श्रीलंका किंवा बांगलादेश) मायदेशात १०० टी-२० सामने खेळता आलेले नाहीत. जागतिक स्तरावर भारतापूर्वी केवळ न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज या दोनच संघांनी हा टप्पा ओलांडला होता. या यादीत ११३ सामन्यांसह न्यूझीलंड अव्वल स्थानी असून, वेस्ट इंडिज १०८ सामन्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मायदेशात सर्वाधिक टी-२० सामने खेळणारे संघ:
| संघ | मायदेशातील एकूण सामने |
| न्यूझीलंड | ११३ |
| वेस्ट इंडिज | १०८ |
| भारत | १०० |
| दक्षिण आफ्रिका | ८४ |
| झिम्बाब्वे | ८४ |
| बांगलादेश | ८२ |
घरच्या मैदानात भारताची ‘दहशत’
टीम इंडिया मायदेशात सर्वाधिक १०० टी-२० सामने खेळणारा पहिला आशियाई संघ
भारतीय संघाला त्यांच्या मायदेशातील परिस्थितीत हरवणे हे कोणत्याही संघासाठी मोठे आव्हान राहिले आहे. भारताचा मायदेशातील १०० सामन्यांचा रेकॉर्ड अत्यंत प्रभावी आहे. दोन वेळा टी-२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियाने केवळ विजयांच्या बाबतीतच नाही, तर सामने खेळण्याच्या बाबतीतही आता सातत्य राखले आहे.
A special century! 💯#TeamIndia is set to step onto the field for their 1⃣0⃣0⃣th T20I match at home in Men’s cricket 👏
Updates ▶️ https://t.co/8G8p1tq1RC#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ERnGoGn3lN
— BCCI (@BCCI) January 23, 2026
- विजय: ६७
- पराभव: २९
- अनिर्णीत: ३
न्यूझीलंडने भारतासमोर ठेवले २०९ धावांचे लक्ष्य –
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत न्यूझीलंडने २० षटकांत ६ बाद २०८ धावा केल्या. मिचेल सँटनरने नाबाद ४७ धावा करून संघाचे नेतृत्व केले. त्याचबरोबर रचिन रवींद्रने ४४ धावांचे योगदान दिले. भारताकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.





