Imtiaz Jaleel : मोठी बातमी..! माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल
Imtiaz Jaleel : नाशिकमधील नामांकित टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे कथित लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याच्या बहुचर्चित प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे.

Imtiaz Jaleel : टीसीएस धर्मांतर आणि महिला लैंगिक शोषण प्रकरणात एआयएमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा जबाब पोलिसांकडून नोंदविण्यात आला आहे. (Imtiaz Jaleel)
नाशिकमधील टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळासह धर्मांतराचा प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले. या प्रकरणात अनेक आरोपींची नावे समोर आली. निदा खान ही प्रमुख आरोपींपैकी एक आहे. निदा खानला आश्रय देण्यात आल्याच्या प्रकरणाचा तपास करताना आता इम्तियाज जलील यांचे नाव पुढे आले आहे. (Imtiaz Jaleel)
पोलिसांच्या तपासादरम्यान, एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या मोबाईल फोनमध्ये काही महत्त्वाच्या रेकॉर्डिंग आढळल्याची माहिती समोर आली आहे. या रेकॉर्डिंगच्या आधारे तपास यंत्रणांनी इम्तियाज जलील यांच्या कथित सहभागाचा तपास सुरू केला. (Imtiaz Jaleel)
पोलिसांनी जलील यांचा जबाब नोंदवला असून त्यांचे व्हॉईस सॅम्पलही घेण्यात आल्याचे समोर आले आहे. या संदर्भातील माहिती विशेष तपास पथकाने न्यायालयासमोर मांडल्याचे बोलले जात आहे. (Imtiaz Jaleel)
निदा खानला आश्रय देण्याच्या प्रकरणात त्यांचा नेमका सहभाग काय?याबाबत तपास यंत्रणा पुरावे तपासत आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने आता पुढील चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. (Imtiaz Jaleel)
Imtiaz Jaleel : आंदोलनाने हुकूमशाही सरकारला संदेश दिला; इम्तियाज जलील यांची केंद्र सरकारवर टीका





