Imtiaz Jaleel : आंदोलनाने हुकूमशाही सरकारला संदेश दिला; इम्तियाज जलील यांची केंद्र सरकारवर टीका
दिल्लीतील जंतरमंतरवर तरुणांनी केलेल्या आंदोलनाने देशातील हुकूमशाही केंद्र सरकारला आता पुरे झाले, असा स्पष्ट संदेश दिला आहे, असे एआयएमआयएम नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी म्हटले आहे.

Imtiaz Jaleel : दिल्लीतील जंतरमंतरवर तरुणांनी केलेल्या आंदोलनाने देशातील हुकूमशाही केंद्र सरकारला आता पुरे झाले, असा स्पष्ट संदेश दिला आहे, असे एआयएमआयएम नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी म्हटले आहे.
जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले, या देशातील केंद्र सरकारने जनतेला गृहीत धरू नये. जर पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये पुरेशी समज असती, तर आंदोलनाच्या सुरुवातीलाच त्यांना विद्यार्थ्यांच्या भावना समजल्या असत्या. केंद्र सरकारने ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांचा वापर करून विरोधकांना कमकुवत केले आणि लोकांच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष केले.
आंदोलनावर आरोप करणे सोपे आहे, परंतु असे करताना सरकारने महिला आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षांकडे पाहिले नाही. आंदोलनातील विद्यार्थ्यांनी सरकारचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत. आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचारांचा आरोप करत जलील म्हणाले, ज्या कर्मचाऱ्यांनी असे कृत्य केले ,ज्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते, त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सत्ताधारी पक्ष पाकिस्तान आणि बांगलादेशशी संबंधित मुद्दे उपस्थित करण्यात व्यस्त राहिले.
परीक्षेच्या प्रश्नपत्रिका एखाद्या किराणा दुकानातील वस्तूंप्रमाणे विकल्या जातात आणि कोणीही याची जबाबदारी घेत नाही. खालच्या स्तरावर काम करणाऱ्या काही लोकांना निलंबित केले जाते आणि नेते दावा करतात की, त्यांनी या प्रकरणात कारवाई केली आहे. पण या प्रकरणात सर्वोच्च नेतृत्वाला जबाबदार धरले पाहिजे आणि त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे, असे जलील यांनी पुढे म्हटले.
राष्ट्रीय हितासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला, असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एक्सवरील पोस्टचीही त्यांनी खिल्ली उडवली. राष्ट्रीय हिताचा निर्णय घेण्यासाठी इतका वेळ लागला. त्याऐवजी फडणवीस यांनीच धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला सांगायला हवे होते, असे जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले.






