चालत्या ट्रेनमध्ये TC ने केले गैरवर्तन,मोबाईलही फेकून दिला…मोहम्मद शमीच्या पत्नीने अनुभवला धक्कादायक ट्रेन प्रवास

नवीदिल्ली – भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँसोबत ट्रेन प्रवासादरम्यान गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. तिने १४ ऑक्टोबर रोजी रेल्वे तिकीट तपासणी कर्मचार्यांवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. क्रिकेटपटूच्या पत्नीचे म्हणणे आहे की, गुरुवारी ती बिहारहून कोलकाता ट्रेनने प्रवास करत असताना तिच्यासोबत गैरवर्तन झाले.याबाबत एक पोस्ट देखील तिने आपल्या सोशल मीडियावरून केली आहे.
हसीन जहाँ आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणते, मी एका नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होऊन बिहारहून कोलकाता येथे परतत होती. माझा सिट नंबर ६ होता,वरची बर्थ देखील रिकामी होती. म्हणून एका प्रवाशाने मला वरती झोपण्यास सांगितले आणि मी त्याचे ऐकले. त्यानंतर जेव्हा मी मालदा स्टेशनवर आले तेव्हा एका व्यक्तीसह टीसी,टीटीने मला झोपेतून उठवले आणि माझ्यासोबत गैरवर्तन केल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.
यावेळी त्यांनी मला सीटवरून बाहेर काढताना माझा मोबाईलही फेकून दिला. या घटनेनंतर मी रेल्वे पीएसकडे तक्रार दाखल केली. यानंतर पुढच्या स्टेशनवर काही पोलीस आले आणि त्यांनी मला प्रोटेक्शन दिले. मग मी पुढचा प्रवास पोलीस सुरक्षेमध्येच केला असलयाचे यावेळी शमीच्या पत्नीने सांगितले तसेच यावेळी तिने पोलिसांचे आभार देखील मानले.

हसीन जहाँ आणि मोहम्मद शमीचे लग्न २०१४ मध्ये झाले होते. पण 2018 मध्ये हसीन जहाँने शमीवर घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगसह अनेक गंभीर आरोप केले. मात्र बीसीसीआयने तपासात शमीला निर्दोष ठरवले. सध्या तो २०२२ च्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियात आहे.





