Tamil Nadu Politics : थलपती विजय यांना मोठा धक्का; तमिळनाडू सरकार कोसळणार? माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ
Tamil Nadu Politics : तमिळनाडूच्या राजकारणात सध्या एका मोठ्या दाव्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

Tamil Nadu Politics : तमिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक (DMK) अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारबाबत मोठा दावा केला आहे. विजय यांचे सरकार बहुमताच्या आधारावर टिकलेले नसून ते कोणत्याही क्षणी कोसळू शकते. पुढील तीन ते सहा महिन्यांत राज्यात पुन्हा विधानसभा निवडणुका होऊ शकतात, असा दावा स्टॅलिन यांनी केला. (Tamil Nadu Politics)
सरकारकडे स्वतःचे बहुमत नसल्याचा दावा
एका पक्षीय कार्यक्रमात बोलताना स्टॅलिन म्हणाले की, तमिळनाडू विधानसभेतील 234 सदस्यांपैकी बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत टीव्हीके (TVK) हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना 108 जागांवरच विजय मिळाला. त्यानंतर काँग्रेस, IUML आणि VCK यांच्या पाठिंब्याने विजय यांनी सरकार स्थापन केले. त्यामुळे हे सरकार स्वतःच्या बळावर नव्हे, तर मित्रपक्षांच्या आधारावर टिकले असल्याचा आरोप त्यांनी केला. (Tamil Nadu Politics)
कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन
आगामी राजकीय घडामोडींचा उल्लेख करत स्टॅलिन यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले. “निवडणुका तीन महिन्यांतही लागू शकतात, सहा महिन्यांतही लागू शकतात. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ज राहावे,” असे आवाहन त्यांनी केले. (Tamil Nadu Politics)
सरकारवर गंभीर आरोप
यावेळी स्टॅलिन यांनी राज्य सरकारच्या कारभारावरही जोरदार टीका केली. तमिळनाडूमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून महिला आणि मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच अघोषित वीज कपात, औद्योगिक धोरणातील त्रुटी आणि त्यामुळे मोठे उद्योग राज्याबाहेर जात असल्याचाही दावा त्यांनी केला. (Tamil Nadu Politics)
स्टॅलिन यांच्या या वक्तव्यानंतर तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, आगामी काळात राज्यातील राजकारण कोणते वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Tamil Nadu Politics)






