Ketan Agarwal Case : अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; केतनला ढकलण्याधी सियाने चेतनला 1 कोटी दिले
Ketan Agarwal Case : लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्याकांडात आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक आर्थिक खुलासा समोर आला आहे.

Ketan Agarwal Case : लोहगडावरील केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणात आर्थिक व्यवहाराचाही महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे. (Ketan Agarwal Case)
पोलिस सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवालने लग्नाच्या खरेदीसाठी दिलेले 1 कोटी रुपये सिया गोयलने कथितपणे तिचा प्रियकर चेतन चौधरीकडे वळवले होते. या व्यवहारामुळे तपासाला नवे वळण मिळाले आहे. (Ketan Agarwal Case)
सूत्रांच्या माहितीनुसार, सियाने लग्नाच्या तयारीसाठी केतनकडून घेतलेली ही रक्कम खरेदीसाठी न वापरता चेतनच्या व्यवसायात गुंतवणुकीसाठी दिली होती. चेतनची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्याला व्यवसाय उभा करण्यासाठी वेळ लागणार असल्याचे त्याने सियाला सांगितले होते. भविष्यात दोघांनी एकत्र आयुष्य सुरू करण्याच्या उद्देशाने हा आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. (Ketan Agarwal Case)
हत्येनंतर लग्न करण्याचा कथित प्लॅन
तपासात असेही समोर आले आहे की, केतनच्या हत्येनंतर काही काळ शांत राहून नंतर सिया आणि चेतन यांनी लग्न करण्याचा कथित प्लॅन आखला होता. त्यामुळे केतनची हत्या हा केवळ गुन्हा नसून त्यामागे भविष्यातील नियोजनही असल्याचा तपासाचा संशय अधिक गडद झाला आहे. (Ketan Agarwal Case)
‘सिग्नल’ ठरल्यानंतर दिला धक्का
पोलिस तपासानुसार, 18 जून रोजी लोहगडावर घडलेल्या घटनेत सियाने पूर्वनियोजित संकेत दिल्यानंतरच चेतनने केतनला दरीत ढकलल्याचा संशय आहे. दोघांमध्ये आधीच ठरल्याप्रमाणे सिया बुटाची लेस बांधण्याचा किंवा पाणी पिण्याचा बहाणा करून खाली बसणार आणि तोच चेतनसाठी हल्ल्याचा संकेत असणार होता. (Ketan Agarwal Case)
तपास अधिकाऱ्यांच्या मते, हे नियोजन अशा प्रकारे करण्यात आले होते की, केतन खाली पडताना सियाला पकडण्याचा किंवा तिलाही दरीत ओढण्याचा धोका निर्माण होऊ नये. (Ketan Agarwal Case)
आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू
या प्रकरणात पोलिस आता संबंधित बँक व्यवहार, पैशांचा प्रवाह आणि डिजिटल पुरावे तपासत आहेत. 1 कोटी रुपयांची रक्कम नेमकी कशी वापरण्यात आली, ती कुठे वळवण्यात आली आणि त्यामागील उद्देश काय होता, याचा सखोल तपास सुरू असून, या आर्थिक व्यवहारांमधून आणखी महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Ketan Agarwal Case)
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; सियाचा भाऊच निघाला चेतनचा…






