Takwe Budruk News : टाकवे बुद्रुक बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी मावळात संतापाची लाट; कठोर कारवाईची ग्रामस्थांची मागणी
Takwe Budruk News : मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथे एका अल्पवयीन बालिकेवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाचे आणि संक्षोभाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Takwe Budruk News : टाकवे बुद्रुक येथे अल्पवयीन बालिकेवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या घटनेने मावळ तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून दोषारोपपत्र तातडीने दाखल करावे. (Takwe Budruk News)
तसेच खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी टाकवे बुद्रुकसह मावळ तालुक्यातील ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे. (Takwe Budruk News)
याबाबत ग्रामस्थांनी वडगाव मावळ पोलिसांना निवेदन देऊन प्रकरणातील सर्व आवश्यक व भक्कम पुरावे संकलित करून तपासात कोणतीही दिरंगाई होऊ नये, अशी मागणी केली. तसेच पीडित बालिका व तिच्या कुटुंबीयांना आवश्यक कायदेशीर मदत व मानसिक आधार मिळावा, अशी मागणीही करण्यात आली. (Takwe Budruk News)
या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. (Takwe Budruk News)
दरम्यान, अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये कायदेशीर प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून दोष सिद्ध झाल्यास आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. (Takwe Budruk News)
फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीसाठी आवश्यक प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. “पीडितेला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाने कठोर व प्रभावी पावले उचलावीत,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (Takwe Budruk News)





