Pune News : निर्णयांची जबाबदारी स्वीकारा, विश्वासार्हता निर्माण करा आणि यशाची स्वतःची व्याख्या ठरवा : गौरी किर्लोस्कर
Pune News : पदवीधर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारण्याचे, विश्वासार्हता निर्माण करण्याचे आणि पद, प्रतिष्ठा किंवा आर्थिक यश यांनाच स्वतःच्या मूल्यमापनाचे मापदंड न मानण्याचे आवाहन किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेडच्या उपाध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक गौरी किर्लोस्कर यांनी केले.

Pune News : पदवीधर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारण्याचे, विश्वासार्हता निर्माण करण्याचे आणि पद, प्रतिष्ठा किंवा आर्थिक यश यांनाच स्वतःच्या मूल्यमापनाचे मापदंड न मानण्याचे आवाहन किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेडच्या उपाध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक गौरी किर्लोस्कर यांनी केले. (Pune News)
त्या विश्वकर्मा विद्यापीठाच्या शुक्रवारी झालेल्या आठव्या दीक्षान्त समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतील विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. (Pune News)
२०२६ च्या पदवीधर विद्यार्थ्यांना संबोधित करताना गौरी किर्लोस्कर म्हणाल्या, “आजच्या क्षणाला आपल्या संपूर्ण आयुष्याचा आराखडा तयार असण्याचा दबाव घेऊ नका. करिअरच्या वाटा बदलत असतात, परिस्थिती बदलत असते आणि कधीकधी अनपेक्षितपणे मिळणाऱ्या संधीच सर्वाधिक अर्थपूर्ण ठरतात. (Pune News)
महत्त्वाकांक्षी राहा आणि जिज्ञासू वृत्ती जपा. आत्मविश्वास उराशी बाळगून अतिशय नम्र राहण्याची ताकदही ठेवा. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी किंवा आर्थिक यश यांवरूनच स्वतःच्या मूल्याचे मोजमाप करू नये.” (Pune News)
खऱ्या यशाविषयी विचार मांडताना त्या पुढे म्हणाल्या, “मागील काही काळात माझा असा विश्वास दृढ झाला आहे की, अर्थपूर्ण जीवनाचे मोजमाप हे आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती, इतरांच्या प्रगतीसाठी आपण केलेले प्रयत्न, आपण निर्माण केलेली नाती आणि समाजासाठी दिलेले योगदान यांवरूनही होते. पदे आणि यशाची प्रतीके कालांतराने मागे पडली, तरी या यशाचे हे मापदंड मात्र कायम अर्थपूर्ण राहतात.” (Pune News)
समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवताना विश्वकर्मा विद्यापीठाचे अध्यक्ष भरत अगरवाल यांनी तंत्रज्ञानाच्या बदलत्या स्वरूपावर प्रकाश टाकला. स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या युगात मानवी मूल्यांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन त्यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना केले. (Pune News)
ते म्हणाले, “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात तुमच्यातील मानवी कौशल्येच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवतील. जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वांसाठी सहज उपलब्ध होईल, तेव्हा केवळ सामान्य बुद्धिमत्ता ही वेगळी ओळख निर्माण करणारी बाब राहणार नाही. (Pune News)
यंत्रांना सहजपणे आत्मसात करता येणार नाहीत अशी सहानुभूती, स्पष्ट संवादकौशल्य, विश्वासार्हता आणि नेतृत्वगुण हीच तुमची खरी ताकद असेल. तुमच्या यशाची दिशादेखील हेच गुण ठरवतील. कृत्रिम बुद्धिमत्तेचा साधन म्हणून वापर करा. मात्र तुमची मानवी मूल्ये हीच तुमची खरी ओळख असली पाहिजे.” (Pune News)
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) मुकुंद कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच विद्यापीठाचा वार्षिक प्रगती अहवाल सादर करताना शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी, आंतरविद्याशाखीय संशोधन आणि जागतिक स्तरावरील मान्यता यांचा आढावा घेतला. (Pune News)
विद्यापीठाच्या आठव्या दीक्षान्त समारंभात आठ विद्याशाखांमधील एकूण १,६३६ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विधी, औषधनिर्माणशास्त्र, रचना, मानवविद्या, वास्तुकला आणि माध्यमे आणि विविध शाखेतील१५ पीएचडी पदव्यांचा समावेश आहे. (Pune News)
विश्वकर्मा विद्यापीठाने शैक्षणिक उत्कृष्टतेच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. टाइम्स हायर एज्युकेशन आशिया क्रमवारी, वर्ल्ड युनिव्हर्सिटीज विथ रिअल इम्पॅक्ट क्रमवारी, फिक्कीचा ‘एक्सलन्स इन ग्लोबलायझेशन’ पुरस्कार आणि क्यूएस आय-गेजचे डायमंड रेटिंग यांसारख्या मान्यतांचा विद्यापीठाच्या कामगिरीत समावेश आहे. अलीकडेच विद्यापीठाला फिक्की हायर एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड्स आणि अमेरिकन मॅनेजमेंट असोसिएशनचा ‘उद्योग-शैक्षणिक सहकार्यासाठी सर्वोत्कृष्ट विद्यापीठ’ हा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. (Pune News)
या समारंभाला विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. वासुदेव गाडे, कुलसचिव प्रा. डॉ. केदार संत, मुख्य परीक्षा नियंत्रक प्रा. डॉ. तुषार जाधव,प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. (Pune News)





