पुणे : ताडी विक्रेतेही आता “मोक्का”च्या कचाट्यात

पुणे – ताडी बनवण्याचे रसायन बाळणाऱ्या सराईतांवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. ताडी विक्रेत्यांवर झालेली ही पहिलीच कारवाई असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, तर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली ही मोक्काची 51 वी कारवाई आहे.
टोळी प्रमुख प्रल्हाद उर्फ परेश भंडारी (रा. पीडीसी बॅंकेसमोर, केशवनगर, मुंढवा), सुनील बनसोडे (20, रा. सोरतापवाडी), शाहरुख मन्सुरी (25, रा. लोणी-काळभोर) आणि त्यांचा फरार साथीदार नीलेश बांगर यांच्यावर मोक्काअंतर्गत करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी आरोपींच्या मोक्काचा प्रस्ताव सादर केला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त नामेदव चव्हाण, गुन्हे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.





