Khel Ratna Award 2022 – भारताचा दिग्गज टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल याची देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अलीकडील काळात हा पुरस्कार माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने दिला जात होता. त्यानंतर केंद्र सरकारने या पुरस्काराचे नाव बदलून दिग्गज खेळाडू मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यात आले होते.
“भारताकडे इतके टॅलेंट आहे की संघ निवडताना गोंधळ उडतो”, भारताच्या माजी क्रिकेटपटूंचं वक्तव्य!
अचंता शरथ कमलला ३० नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवनात देशाच्या क्रीडाक्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. खेलरत्न पुरस्काबरोबरच इतर २५ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षकांना दिल्या जाणाऱ्या द्रोणाचार्य पुरस्कारानेही सन्मानित केले जाईल. भारतीय क्रीडा मंत्रालयाने सोमवारी (१४ नोव्हेंबर) याबाबत माहिती दिली आहे.
चाळीस वर्षीय अचंता शरथ कमल हे भारतीय टेबल टेनिसमधील एक मोठे नाव असून गेल्या काही वर्षांत त्याने या खेळात अप्रतिम कामगिरी केल्या आहेत. याच वर्षी झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली होती. त्याचबरोबर अर्जुन पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या बहुतांश खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत देशासाठी चमकदार कामगिरी केलेली आहे.
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार २०२२ – अचंता शरथ कमल (टेबल टेनिस)
अर्जुन पुरस्कार विजेते – सीमा पुनिया (अॅथलेटिक्स), अल्डोस पॉल (अॅथलेटिक्स), अविनाश मुकुंद साबळे (अॅथलेटिक्स), लक्ष्य सेन (बॅडमिंटन), एचएस प्रणॉय (बॅडमिंटन), अमित (बॉक्सिंग), निखत जरीन (बॉक्सिंग), भक्ती प्रदीप कुलकर्णी (बुद्धिबळ), आर. प्रज्ञानानंद (बुद्धिबळ), दीप ग्रेस एक्का (हॉकी), सुशीला देवी (जुडो), साक्षी कुमारी (कबड्डी), नयन मोनी सैकिया (लॉन बॉल), सागर कैलास ओवलकर (मलखांब), इलावेनिल वालारिवन (नेमबाजी), ओमप्रकाश मिथरवाल (नेमबाजी) , श्रीजा अकुला (टेबल टेनिस), विकास ठाकूर (वेटलिफ्टिंग), अंशू (कुस्ती), सरिता (कुस्ती), परवीन (वुशू), मानसी गिरीशचंद्र जोशी (पॅरा बॅडमिंटन), तरुण ढिल्लोन (पॅरा बॅडमिंटन), स्वप्नील संजय पाटील (पॅरा स्विमिंग) गर्लिन अनिका जे (बॅडमिंटन).
Youth Affairs & Sports Ministry announces #NationalSportsAwards2022. The awardees will receive their awards from President on November 30.
Table Tennis player Sharath Kamal Achanta chosen for Major Dhyan Chand Khel Ratna Award. Arjuna Awards will be given to 25 sportsperson. pic.twitter.com/USguotjmdP
— All India Radio News (@airnewsalerts) November 14, 2022