‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील अभिनेता रुग्णालयात दाखल; शेअर केला व्हिडिओ

Gurucharan Singh | ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा शो गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमध्ये रोशन सिंग सोढ़ीची भूमिका साकारणारा टीव्ही कलाकार गुरुचरण सिंह याच्याबद्दल एक माहिती समोर आली आहे. मंगळवारी गुरुचरणने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका सोडल्यानंतरही मागील काही दिवसांपासून गुरुचरण त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे.
गुरुचरण सिंह यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ते हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला दिसत आहे. त्याचबरोबर त्याच्या हाताला सलाईनही लावले आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी तब्येत खूप खराब झाल्याचे सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये गुरुचरणने ‘माझी तब्येत खूपच बिघडली आहे. रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या असून माझ्या प्रकृतीबाबतची माहिती तुम्हाला लवकरच देईल,’ असे सांगितले आहे. Gurucharan Singh |
View this post on Instagram
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘ गुरू पुरबच्या दिवशी गुरु साहेबजींनी मला एक नवीन आयुष्य दिलं. मी त्यांचे अगणित आभार मानतो.’ त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्याला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच त्याने नेमकं काय झाले हे सांगितले नसल्याने चाहते संभ्रमात आहेत. Gurucharan Singh |
दरम्यान, गेल्या वर्षी गुरुचरण सिंग एका मिटींगसाठी जातो म्हणून गुरुचरण त्याच्या दिल्लीतल्या घरातून निघाला होता. मात्र त्यानंतर तो घरी परतला नसल्याने वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी त्याचा शोध सुरु केल्यानंतर जवळपास महिन्याभरानंतर गुरुचरण सुखरुप त्याच्या घरी परतला.
हेही वाचा:
चीनच्या ‘सुपर डॅम’ चा जगाला धोका ! धरणाच्या निर्मितीने पृथ्वीचा वेग मंदावला ; नासाने दिला इशारा





