‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील आणखी एक कलाकार मालिका सोडणार? अभिनेत्याने स्वत: केला खुलासा

Mandar Chandwadkar | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. या मालिकेमुळे कलाकारांना मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र गेले कित्येक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या मालिकेतील काही कलाकरांनी हा शो सोडला आहे. आता भिडे गुरुजींच्या भूमिकेतील मंदार चांदवडकर देखील ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र या अफवांवर मंदारने मौन सोडले आहे.
मंदार चांदवडकरने मालिका सुभोजित घोष यांच्या पॉडकास्टमध्ये सोडण्याच्या अफवांवर मौन सोडले. तो म्हणाला की, ”खरचं एक कायदा असला पाहिजे असे वाटते, जे सोशल मीडियावर कोण असू शकते हे ठरवेल. जिथे मी मालिका सोडल्याची अफवा ही फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी केलेला अट्टाहास आहे. हे सर्व त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी आहे. अशा अफवांमुळे त्यांचे सबस्क्रायबरही वाढतात. अशा खोट्या बातम्यांमुळे, माझ्या कुटुंबीयांनी मला अनेकदा विचारले आहे की मी शो सोडण्याचा निर्णय का घेतला आहे, परंतु ते खरे नाही.”
मंदारने तारक मेहता कधीही सोडले नाही याचे मुख्य कारण म्हणजे नोकरीतील समाधान. तो म्हणाला, ”मी १७ वर्षे या मालिकेचा खूप आनंद घेतला आहे आणि आजही मी सेटवर खूप मजा करतो. आम्हाला आमच्या शोमध्ये दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळते. आमच्या शोला सर्वांचे आशीर्वाद मिळाले आहेत, त्यामुळेच इतक्या चढ-उतारानंतरही आम्ही १७ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहोत. मला माझे पात्र किंवा माझे काम कंटाळवाणे वाटत नाही.”
या मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारणाऱ्या पलक सिंधवानीने देखील काही महिन्यांपूर्वी शो सोडला आहे. निर्मात्यांशी झालेल्या वादानंतर अभिनेत्रीने हे पाऊल उचलले होते.





