Actress Babita : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेमधून फेमस झालेली बबिताजी अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता नेहमी चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी मुनमुन व्हेकेशन ट्रीपवर गेली होती. या ट्रीप दरम्यान तिने फोटो शूट केला होता. सोशल मीडियावर तिने फोटो शेअर केले होते. तिचे फोटो पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. इतके ग्लॅमरस फोटोशूट मुनमुनने केले होते. आता मुनमुन या मालिकेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. यावर अभिनेत्री मुनमुनने स्वतः मौन सोडत सुरू असलेल्या चर्चांनावर खुलासा केला आहे. मालिका जगतातील अत्यंत लोकप्रिय शो म्हणून तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेकडे पाहिले जाते. गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ या मालिकेने प्रेक्षकांसोबत आपली नाळ घट्ट ठेवली आहे. आजही अगदी लहानपासून ते मोठ्यांपर्यंत ही मालिका सर्वजण पाहतात. नुकतीच या मालिकेत बबिताचे पात्र साकारणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ता शो सोडणार असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता स्वत: मुनमुन दत्ताने यावर मौन सोडले आहे. प्रत्येक अफवा ही खरी नसते, अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. सोशल मीडिया अकाऊंटवरून तिने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती मालिकेच्या शूटिंगमध्ये दिसत आहे. यामुळे या सर्व अफवा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या शोमधील बबिताची भूमिका साकरणारी अभिनेत्री मुनमुन दत्ताचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुनमुन नेहमी तिच्याविषयीच्या अपडेट शेअर करत असते. हेही वाचा : संजय राऊतांचा राष्ट्रवादीच्या आमदारावर गंभीर आरोप; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, आमदार सुनील शेळके म्हणाले…