‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतून कोमल भाभी बाहेर? स्वत: केले स्पष्ट

Taarak Mehta Ka Ooltah Chashma | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करत आहे. सध्या यातील अनेक जुने कलाकार मालिका सोडून गेले आहेत. तर त्यांच्या जागी नव्या कलाकरांची एंट्री झाली आहे.
यानंतर आता कोमल भाभी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री अंबिका रंजनकर यांनी देखील हा शो सोडल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र या चर्चांबाबत अंबिका यांनी मौन सोडले आहे.
अंबिका रंजनकर यांनी एका मुलाखतीत या अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. “मी शो सोडलेला नाही. मी अजूनही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा भाग आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे मी काही दिवस शूटिंगपासून दूर होते. मला माझ्यासाठी थोडा वेळ हवा होता,” असे म्हणत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
अंबिका रंजनकर या गेल्या १७ वर्षांपासून या मालिकेत कोमल भाभीचे पात्र साकारत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक लोकप्रिय कलाकारांनी शो सोडल्यामुळे प्रेक्षक नाराज होते. मात्र कोमल भाभी अर्थात अंबिका रंजनकर यांनी मालिका सोडणार नसल्याचे स्पष्ट केल्याने चाहत्यांना देखील दिलासा मिळाला आहे. Taarak Mehta Ka Ooltah Chashma |
हेही वाचा :





