T20 World Cup 2024 : श्रीलंकेची नेदरलँड्सवर 83 धावांनी मात; फलंदाजांनंतर गोलंदाजांनी केला कहर…

T20 World Cup 2024 (Sri Lanka Vs Netherlands) :- टी-२० विश्वचषकाच्या ३८ व्या सामन्यात श्रीलंकेने नेदरलँड्सचा ८३ धावांनी पराभव केला. सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी क्रिकेट मैदानावर नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकांत ६ गडी गमावून २०१ धावा केल्या आणि नेदरलँडला २०२ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात नेदरलँड्सचा संघ १६.४ षटकांत सर्वबाद ११८ धावांवर आटोपला.
या विश्वचषकात २०० धावा करणारा श्रीलंका हा दुसरा संघ ठरला. यापूर्वी १७ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध २०१ धावा केल्या होत्या. या दोन संघांशिवाय या विश्वचषकात अन्य कोणत्याही संघाला २०० धावांचा टप्पा गाठता आला नाही. नेदरलँड्सवर श्रीलंकेचा हा सलग चौथा विजय आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण ४ सामने झाले आहेत. श्रीलंकेने सर्व सामने जिंकले आहेत. विश्वचषकात दोघेही नेहमीच भिडले आहेत.
Sri Lanka sign off the #T20WorldCup with a comfortable win over Netherlands 👏#SLvNED: https://t.co/O50ERowweA pic.twitter.com/EXn0nFSx8s
— ICC (@ICC) June 17, 2024
श्रीलंकेसाठी कुसल मेंडिस आणि चारिथ असलंका यांनी ४६ धावांची खेळी खेळली. धनंजय डी सिल्वाने ३४ आणि अँजेलो मॅथ्यूजने नाबाद ३० धावा केल्या. कर्णधार वानिंदू हसरंगाने अखेरच्या डावात ६ चेंडूत २० धावांची नाबाद खेळी केली. नेदरलँडकडून लोगान व्हॅन बीकने दोन बळी घेतले. टीम प्रिंगल, व्हिव्हियन किंगमा, पॉल व्हॅन मीकरेन आणि आर्यन दत्त यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
२०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड संघाच्या फलंदाजांवर मोठी धावसंख्या उभारण्याचे दडपण होते. मायकेल लेविट आणि कर्णधार स्कॉट एडवर्ड्स यांच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. या दोन्ही फलंदाजांनी ३१ धावा केल्या. सायब्रँड एंजेलब्रेक्ट ११, मॅक्स ओ’डॉडने ११ आणि आर्यन दत्तने १० धावा केल्या. याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
T20 World Cup 2024 : पाकिस्तानचा कसाबसा विजय, आयर्लंडलवर 3 गडी राखून केली मात…
श्रीलंकेच्या गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली. नुवान तुषाराने ३ बळी घेतले. वनिंदू हसरंगा आणि मथिश पाथिराना यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. महिष तक्षाना आणि दासुन शनाका यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
या विजयासह श्रीलंका ड गटात १ विजयानंतर ३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. नेदरलँडचा संघ ४ सामन्यांत २ गुणांसह चौथ्या स्थानावर असून नेपाळ संघ ४ सामन्यांत १ गुणांसह ५ व्या स्थानावर आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिका ४ सामन्यात ४ विजय मिळवून ८ गुणांसह पहिल्या स्थानावर असून बांगलादेश संघ ४ सामन्यात ३ विजय आणि ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ सुपर-8 साठी पात्र ठरले आहेत.
T20 World Cup 2024 : बांगलादेशचा सुपर-8 मध्ये प्रवेश, नेपाळला 21 धावांनी केलं पराभूत…
संक्षिप्त धावफलक – श्रीलंका २० षटकात ६ बाद २०१ धावा. (कुशल मेंडीस ४६, चरिथा असालंका ४६, अंजेलो मॅथ्युज ३०, वनिंदू हसरंगा नाबाद २०, वॅन बिक २-४५). नेदरलॅण्ड – १६.४ षटकांत सर्वबाद ११८ धावा. (मायकल लेवीट ३१, स्कॉट एडवर्डस ३१, नुवान तुषारा ३-२४).





