T20 World Cup 2024 : न्यूयॉर्कमध्ये भारतीय गोलंदाजांचा कहर; आयर्लंड केवळ 96 धावांवर गारद….

T20 World Cup 2024 (IND vs IRE, Live Score Update) :- टी-20 विश्वचषक 2024 च्या आठव्या सामन्यात भारताचा सामना अ गटात आयर्लंडशी होत आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा या आवृत्तीतील हा पहिला सामना आहे आणि रोहित शर्मा आणि कंपनीला या स्पर्धेची सुरुवात विजयाने करायची आहे. तथापि, आयर्लंड उलटफेर करण्यात पटाईत आहे आणि टीम इंडियाला त्यांच्यापासून सावध राहावे लागेल.
भारताविरुद्धच्या सामन्यात प्रथम खेळताना आयर्लंडचा संपूर्ण संघ 96 धावांत गडगडला. आयरिश संघाचे केवळ 4 फलंदाज दुहेरी आकडा ओलांडू शकले आणि उर्वरित 7 फलंदाजांनी आपल्या फलंदाजीने 10 धावाही केल्या नाहीत. आयर्लंडकडून सर्वाधिक धावा गॅरेथ डेलेनीने केल्या, ज्याने 14 चेंडूत 26 धावा केल्या.
Innings Break!
Cracking bowling display from #TeamIndia! ⚡️ ⚡️
3⃣ wickets for vice-captain @hardikpandya7
2⃣ wickets each for @Jaspritbumrah93 & @arshdeepsinghh
1⃣ wicket each for @akshar2026 & @mdsirajofficialStay Tuned for the India chase! ⌛️
Scorecard ▶️… pic.twitter.com/oNQvgst1pg
— BCCI (@BCCI) June 5, 2024
पहिल्याच षटकापासून भारतीय गोलंदाजांनी धुमाकूळ घातला आणि उपकर्णधार हार्दिक पंड्याने सर्वाधिक विकेट घेतल्या. हार्दिकने एकूण 3 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन बळी घेत आयर्लंडला मोठी धावसंख्या बनवण्यापासून वंचित ठेवले. आता टी-20 विश्वचषकाची विजयाने सुरुवात करण्यासाठी भारताला 97 धावा कराव्या लागणार आहेत. शेवटच्या 2 विकेट्समध्ये आयर्लंडने एकूण 46 धावा केल्या हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे.
आयर्लंडची सुरुवात इतकी खराब झाली की पहिल्या 3 षटकांतच संघाने सुरुवातीच्या दोन्ही फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या. कर्णधार पॉल स्टर्लिंग 2 धावा करून बाद झाला आणि अँड्र्यू बार्लबर्नीलाही केवळ 5 धावा करता आल्या. अर्शदीप सिंगने या दोन्ही फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पॉवरप्ले ओव्हर्समध्ये आयर्लंडचा स्कोअर 2 गडी गमावून 26 रन्स होता. लॉर्कन टकर चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि 10 धावा केल्यानंतर क्रीजवर सेट झाला होता, पण हार्दिक पांड्याने त्याला 7 व्या षटकात क्लीन बोल्ड केले. हॅरी टेक्टरची बॅटही शांत राहिली, त्याला 16 चेंडू खेळून केवळ 4 धावा करता आल्या.
परिस्थिती अशी होती की डावाच्या पहिल्या 61 चेंडूतच संघाने 7 विकेट गमावल्या होत्या आणि स्कोअरबोर्डवर केवळ 49 धावा झाल्या होत्या. 12व्या षटकात आयर्लंडने 50 धावांचा टप्पा गाठला, मात्र त्याच षटकात अक्षर पटेलने बॅरी मॅकार्थीची विकेट घेतली. दरम्यान, जोशुआ लिटल आणि गॅरेथ डेलेनी यांच्यात 27 धावांची छोटी पण महत्त्वाची भागीदारी झाली, मात्र 14 धावांच्या स्कोअरवर लिटल बुमराहच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. आयर्लंडने 15 षटकांपर्यंत 79 धावापर्यंत मजल मारली होती आणि फक्त एक विकेट शिल्लक होती. अखेरीस, 16व्या षटकात गॅरेथ डेलेनी धावबाद झाल्याने आयर्लंडचा डाव 96 धावांवर आटोपला.
आयर्लंडची दुसरी सर्वात कमी धावसंख्या….
टी-20 विश्वचषकात आयर्लंडची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी 2010 च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध आयरिश संघ अवघ्या 68 धावांवर ऑलआऊट झाला होता. आता 96 ही त्याची टी-20 विश्वचषकातील दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. आयर्लंड हा चौथा संघ बनला आहे ज्याला भारताने टी-20 विश्वचषकात 100 धावसंख्येच्या आत रोखले आहे. याआधी भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि स्कॉटलंडला 100 धावसंख्येच्या आत रोखले आहे.





