Virat Kohli : ‘कोहली’चे आणखी एक ‘विराट’ यश, ‘या’ बाबतीत ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार जूनियरला टाकलं मागे…

Virat Kohli, Most Followed Athlete On Twitter/X : भारतीय क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंपैकी एक विराट कोहली प्रत्येक क्रीडाप्रेमीच्या हृदयात राहतो. आता त्याच्या लोकप्रियतेत एका नव्या कामगिरीची भर पडली आहे. खरं तर, फुटबॉल सुपरस्टार नेमार जूनियरला मागे टाकून विराट कोहली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर दुसरा सर्वाधिक फॉलो केलेला खेळाडू बनला आहे.
किती कोटी आहेत फॉलोअर्स ?
ताज्या आकडेवारीनुसार, 35 वर्षीय कोहलीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर 6.35 कोटी (63,562,572) फॉलोअर्स आहेत, ज्याने 32 वर्षीय ब्राझीलचा आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू नेमारला थोड्या फरकाने मागे टाकले आहे. नेमार जूनियरचे 6.34 कोटी फॉलोअर्स आहेत. क्रिस्टियानो रोनाल्डोचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. रोनाल्डो 11.14 कोटी फॉलोअर्ससह पहिल्या क्रमांकावर आहे.
कोहलीचे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किती आहेत फॉलोअर्स?
विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर जवळपास 27 कोटी फॉलोअर्स असून तो 302 लोकांना फॉलो करतो. त्याच्या फेसबुक पेजवर 5.1 कोटी फॉलोअर्स आहेत आणि कोहली फेसबुकवर 24 लोकांना फॉलो करतो.
Indonesia Open 2024 : भारताची स्टार शटलर पी.व्ही. सिंधूची ‘हाराकिरी’ कायम…
दरम्यान, या वर्षी, किंग कोहली सर्च इंजिन गुगलच्या संपूर्ण 25 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या क्रिकेटपटूंमध्येही अव्वल स्थानावर आहे. कोहलीशिवाय महान सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, रोहित शर्मा या खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे.






