T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा गोलंदाजीचा निर्णय, आयर्लंडविरुद्ध ‘या’ 11 जणांना मिळालं संघात स्थान…

T20 World Cup 2024 (IND vs IRE, Playing XI Update) :- टी-20 विश्वचषक 2024 च्या आठव्या सामन्यात आज भारताचा सामना अ गटात आयर्लंडशी होत आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या आवृत्तीतील टीम इंडियाचा हा पहिला सामना आहे आणि रोहित शर्मा आणि कंपनीला या स्पर्धेची सुरुवात विजयाने करायची आहे. तथापि, आयर्लंड उटलफेर करण्यात पटाईत आहे आणि टीम इंडियाला त्यांच्यापासून दूर राहावे लागेल.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल (Toss Update) हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार रोहित शर्मानं आयर्लंडविरूध्द नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. (WT20 2024. India Won the Toss and Elected to Field) त्यामुळे आयर्लंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल.
रोहित टाॅसनंतर म्हणाला की, टीम इंडिया चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरली आहे. यामध्ये बुमराह, अर्शदीप, सिराज आणि हार्दिक यांचा समावेश आहे. त्याचबरोबर संघ दोन फिरकी अष्टपैलू खेळाडूंसह आला आहे. यामध्ये रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. यशस्वी, संजू, चहल आणि कुलदीप हा सामना खेळत नाहीत. यशस्वी खेळत नसल्याने रोहितसोबत विराटच सलामी देणार हे स्पष्ट झाले आहे.
🚨 Toss Update from New York 🚨
Captain @ImRo45 has won the toss & #TeamIndia have elected to bowl against Ireland.
Follow The Match ▶️ https://t.co/YQYAYunZ1q#T20WorldCup | #INDvIRE pic.twitter.com/bNQaPO854i
— BCCI (@BCCI) June 5, 2024
IND vs IRE : दोन्ही संघांची Playing 11 खालीलप्रमाणे…
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
आयर्लंड : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबिर्नी, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅकार्थी, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.
दरम्यान, भरात असलेला भारतीय संघाची आज तुलनेने दुबळ्या आयर्लंड संघाशी लढत होत आहे. तसे पाहायला गेले तर या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड राहिलेले असले तरीही आयर्लंडचा संघही जायंट किलर म्हणून प्रसिद्ध आहे.
भारत आणि आयर्लंडमध्ये 7 वेळा टी-20 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये आयर्लंडला प्रत्येक वेळी पराभवाला सामोरे जावे लागले. तर T20 वर्ल्ड कपमध्ये भारत-आयर्लंड सामना एकदाच झाला होता, ज्यामध्ये टीम इंडियाने बाजी मारली होती.





