T20 World Cup 2024 (IND vs CAN) : चाहत्यांची प्रतीक्षा आणखी लांबणीवर..! मैदान अद्याप ओले, आता 9 वाजता पंच पुन्हा करणार पाहणी, जाणून घ्या…लेटेस्ट अपडेट

T20 World Cup 2024 (India vs Canada, Live Score) : सलग तीन सामने जिंकून सुपर एटमध्ये स्थान मिळवणाऱ्या भारतीय संघाचा आज गट टप्प्यातील शेवटच्या सामन्यात कॅनडाशी सामना होणार आहे. भारतीय संघ विजयी लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल, तर कॅनडाचा संघ भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करेल.
IND vs CAN Latest Update (08:16 PM, 15-JUN-2024) : पंच पुन्हा करतील पाहणी
नियोजित वेळेनुसार सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र ओल्या आऊट फिल्डमुळे टाॅसला उशीर झालाय. पंचांकडून 8 वाजता खेळपट्टीची पाहणी केली गेली. पंच रिचर्ड केटलबरो आणि शराफुद्दौला यांनी मैदानाची पाहणी केली. मात्र, अजूनही अनेक ठिकाणी पाणी साचले असून, मैदान ओले आहे. अशा स्थितीत सामना सुरू होण्यासाठी सध्या परिस्थिती योग्य नाही. आता भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता पंच पुन्हा पाहणी करतील. याबाबतची माहिती बीसीसीआयने सोशल मीडियावरुन दिली आहे.
The wait continues ⏳
Next inspection at 11:30 AM Local Time (9:00 PM IST).#T20WorldCup | #TeamIndia | #CANvIND https://t.co/jIH8wRCF0w
— BCCI (@BCCI) June 15, 2024
IND vs CAN Latest Update (07:26 PM, 15-JUN-2024) : टॉसला उशीर…
फ्लोरिडामध्ये भारत आणि कॅनडा यांच्यातील सामन्याला सुरुवात होण्यास उशीर होणार आहे. पावसामुळे मैदान ओले असल्याने नाणेफेक होण्यास विलंब होणार असून पंच रात्री 8.00 वाजता मैदानाची पाहणी करतील त्यानंतर सामना सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. फ्लोरिडामध्ये सध्या पाऊस पडत नाही ही दिलासादायक बाब आहे. टीम इंडियावर सामना रद्द झाल्याचा कोणताही परिणाम होणार नाही, कारण भारतानं आधीच सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे.
🚨 UPDATE from Florida 🚨
Toss delayed due to wet outfield.
Next inspection at 10.30 AM Local Time (8 PM IST).
Stay Tuned for more updates. ⌛️#T20WorldCup | #TeamIndia | #CANvIND
— BCCI (@BCCI) June 15, 2024
टीम इंडियात बदल होणार…?
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, विराट कोहली कॅनडाविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो, कारण तो ओपनिंग करताना सलग तीन वेळा फ्लॉप ठरला आहे. तथापि, असे घडण्याची आशा फारच कमी आहे. आजही फक्त विराट कोहली आणि रोहित शर्मा डावाची सुरुवात करू शकतात. तर टीम इंडिया कोणताही बदल न करता मैदानात उतरू शकते.
आतापर्यंत हे संघ ठरले पात्र…
अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना रद्द झाल्यामुळे पाकिस्तानसह आयर्लंड आणि कॅनडाचे संघही सुपर-8 च्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. भारत आणि यूएसए पुढच्या फेरीत म्हणजेच सुपर-8 मध्ये दाखल झाले आहेत. आतापर्यंत 6 संघ सुपर-8 मध्ये पात्र ठरले आहेत. यामध्ये भारत, अमेरिका, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. आता बांगलादेश आणि इंग्लंड हे उरलेले दोन संघ असू शकतात.





