T20 Mumbai League : टी-20 मुंबई लीगचे नवे वेळापत्रक जाहीर! आता ‘या’ तारखेपासून रंगणार सामने

T20 Mumbai League Schedule Revised to Start on June 4 : मुंबई टी-२० लीगचे वेळापत्रक पूर्णपणे बदलले आहे. आता ही स्पर्धा २६ मे ऐवजी ४ जूनपासून सुरू होईल. आयपीएल २०२५ च्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे या लीगचे वेळापत्रक बदलावे लागले आहे. आता स्पर्धेत दररोज दोन सामने खेळवले जातील, तर अंतिम सामना १० जून रोजी खेळला जाईल. मुंबई लीगचे सर्व सामने दोन ठिकाणी होतील. स्पर्धेतील सर्व सामने वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियममध्ये होतील.
स्पर्धेचे वेळापत्रक बदलले –
या लीगमध्ये एकूण आठ संघ सहभागी होत आहेत. या हंगामाचा लिलाव ७ मे रोजी झाला. लिलावात विकला गेलेला अथर्व अंकोलेकर हा सर्वात महागडा खेळाडू होता. आता आयपीएल २०२५ च्या वेळापत्रकात झालेल्या बदलाचा परिणाम मुंबई टी-२० लीगवरही झाला आहे. ही स्पर्धा आता २६ मे ऐवजी ४ जून रोजी सुरू होईल आणि अंतिम सामन्यासह सर्व सामने फक्त सात दिवसांत खेळवले जातील. जेतेपदाचा सामना १० जून रोजी खेळला जाईल.
🚨 UPDATE ON T20 MUMBAI LEAGUE 🚨
– The league has been rescheduled to June 4 to 10 with Double Headers. [Gaurav Gupta from TOI] pic.twitter.com/mgqOlO0ork
— Johns. (@CricCrazyJohns) May 16, 2025
आता स्पर्धेत दररोज दोन सामने खेळवले जातील. सर्व सामने वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियममध्ये आयोजित केले जातील. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होत आहेत. सूर्यकुमार यादव, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर यांसारखे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होताना दिसणार आहेत. रोहित शर्माला या लीगचा मुख्य चेहरा बनवण्यात आले आहे.
हेही वाचा – India A Squad : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! ‘या’ खेळाडूकडे सोपवली कर्णधारपदाची धुरा
अथर्व अंकोलेकर ठरला सर्वात महागडा खेळाडू –
T20 Mumbai League 2025: Season 3 Auction@MumbaiCricAssoc pic.twitter.com/yJ95SHgoqn
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) May 7, 2025
मुंबई टी-२० लीगचा लिलाव ७ मे रोजी झाला, ज्यामध्ये अथर्व अंकोलेकर हा सर्वात महागडा खेळाडू होता. त्याला १६.२५ लाख रुपये खर्च करून ईगल ठाणे संघाने खरेदी केले. मुशीर खानवरही भरपूर पैशांचा वर्षाव झाला आणि त्याला एआरसीएस अंधेरी संघाने १५ लाख रुपयांना खरेदी केले. ईगल ठाणे स्ट्रायकर्सनेही साईराज पाटीलसाठी १५ लाख रुपये खर्च केले. त्याच वेळी, आयपीएलमध्ये चमकणाऱ्या १७ वर्षीय आयुष म्हात्रेला मुंबई नॉर्थ ईस्टने १४.७५ लाख रुपयांना खरेदी केले आहे.





