T20 Cricket : वेगवान गोलंदाज अर्शदीपची अनोखी कामगिरी
Updated On:

डब्लिन :- आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने जसप्रीत बुमराहचा मोठा विक्रम मोडला आहे. आता तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम बुमराहच्या नावावर होता.
आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात अर्शदीप सिंगने केवळ एक बळी घेतला, मात्र यासह त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 50 बळी पूर्ण केले. अर्शदीपने 33 डावांत 50 बळी घेतले.
यापूर्वी बुमराहने 41 डावांत 50 बळी घेतले होते व तो एक विक्रम ठरला होता. आता ही कामगिरी अर्शदीपच्या नावावर नोंदली गेली आहे.
दरम्यान, डबलिन इथं झालेला भारत आणि आयर्लंडदरम्यानचा दुसरा 20 षटकांचा सामना भारताने 33 धावांनी जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. भारताच्या 185 धावांना प्रत्युत्तर देताना आयर्लंडचा संघ 152 धावा करू शकला.





