“आयफा’च्या ग्रीन कार्पेटवर स्वरा भास्कर चालली अनवाणी

“आयफा-2019’च्या पुरस्कार वितरणाच्या समारंभामध्ये सहभागी झालेल्या स्वरा भास्करची चांगलीच फजिती झाली. आपापल्या फॅशन स्टाईलनुसार सगळेच कलाकार ग्रीन कार्पेटवरून चालत येत होते. मात्र स्वरा भास्कर या ग्रीन कार्पेटवरून येत असताना अचानक थबकली. तिने आपले सॅन्डल काढले. ते काढलेले सॅन्डल हातात घेऊन ती अनवाणी पायांनीच प्रेक्षागृहामध्ये आली.

कदाचित स्वराला तिचे सॅन्डल टोचत असावेत. त्यामुळे तिला नीट चालता येत नव्हते. सॅन्डल ऍडजस्ट करण्यासाठी तिने एक सॅन्डल काढला. त्यावेळची तिची रिऍक्‍शन मिडीयावाल्यांनी लगेच टिपली. अधिक नामुष्की येऊ नये, म्हणून स्वरा भास्करने दुसरा सॅन्डलही काढला आणि ती सॅन्डलची जोडी हातात घेऊन अनवाणी पायांनीच ती चालत आली. स्वराच्या बाबतीत अशी घटना काही पहिल्यांदाच घडलेली नाही.

गणेशोत्सवादरम्यान स्वरा लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला गेली होती. त्यावेळी गर्दीमध्येच तिने काढून ठेवलेल्या सॅन्डलपैकी एक सॅन्डल हरवला. त्यामुळे स्वराने दुसरा सॅन्डल हातात घेतला आणि अनवाणी पायांनी कारमध्ये येऊन बसली होती. याचाही व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)