Suvendu Adhikari : सर्वात कमी संपत्ती असणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये सुवेन्दू अधिकारी दुसऱ्या क्रमांकावर; एडीआरचा अहवाल समोर
देशातील ३१ मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांच्या विश्लेषणातून (Suvendu Adhikari) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Suvendu Adhikari : देशातील ३१ मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांच्या विश्लेषणातून (Suvendu Adhikari) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि नॅशनल इलेक्शन वॉचच्या अहवालानुसार, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेन्दू अधिकारी (Suvendu Adhikari) हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमी संपत्ती असलेले मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांनी आपली एकूण संपत्ती ८५.८७ लाख रुपये असल्याचे घोषित केले आहे.
या अहवालानुसार, देशात सर्वात कमी संपत्ती असलेले मुख्यमंत्री जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आहेत. त्यांची घोषित संपत्ती अवघी ५५.२४ लाख रुपये आहे. ओमर अब्दुल्ला (जम्मू-काश्मीर) – ५५.२४ लाख, सुवेन्दू अधिकारी (पश्चिम बंगाल) – ८५.८७ लाख, भजनलाल शर्मा (राजस्थान) – १.०३ कोटींहून अधिक यांचा सर्वात कमी संपत्ती असलेल्या पहिल्या तीन मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश आहे.
तर दुसऱ्या बाजूला, संपत्तीच्या बाबतीत कर्नाटकाचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे या यादीत अव्वल स्थानी आहेत. त्यांची घोषित संपत्ती १,४१३ कोटी रुपयांहून अधिक आहे. ३१ मुख्यमंत्र्यांपैकी तब्बल ४ मुख्यमंत्री (१३%) हे अब्जाधीश (१०० कोटींहून अधिक संपत्ती) आहेत.
देशातील ३१ मुख्यमंत्र्यांची सरासरी संपत्ती ११८.०७ कोटी रुपये इतकी आहे. विश्लेषित केलेल्या ३१ मुख्यमंत्र्यांपैकी १४ मुख्यमंत्र्यांवर (४५%) गुन्हेगारी खटले नोंदवलेले आहेत. यापैकी ११ मुख्यमंत्र्यांवर (३५%) गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी आरोप आहेत. निवडणूक सुधारणांवर (Suvendu Adhikari) काम करणाऱ्या एडीआर या गैर-सरकारी संस्थेने नेत्यांनी निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या अधिकृत प्रतिज्ञापत्रांच्या आधारे ही माहिती प्रसिद्ध केली आहे.






