Hardeep Singh Puri : हरदिपसिंग पुरी यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार हरदिपसिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. पोटनिवणुकीच्या रिंगणात एकमेव उमेदवार असल्याने त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली.

Hardeep Singh Puri : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार हरदिपसिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. पोटनिवणुकीच्या रिंगणात एकमेव उमेदवार असल्याने त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली.
भाजपचे नेते एल.मुरूगन यांनी नुकताच केंद्रीय मंत्रिपदाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे मध्यप्रदेशातून राज्यसभेवर निवडून द्यावयाची एक जागा रिक्त झाली. ती रिक्त जागा भरण्यासाठी १२ नोव्हेंबरला पोटनिवडणूक घेण्याचे जाहीर करण्यात आले.
लवकरच ७४ वर्षीय पुरी (Hardeep Singh Puri) यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपत असल्याने त्यांना पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिली. इतर २ अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केले.
त्यामध्ये कॉंग्रेसने पाठिंबा दिलेल्या राजकुमार लोहानी यांचाही समावेश होता. मात्र, दोन्ही अपक्षांचे उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आले. त्यामुळे पुरी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत गुरूवारी समाप्त झाली. त्यानंतर पुरी यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.
त्यामुळे प्रत्यक्ष पोटनिवडणूक टळली. पोटनिवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार विधानसभेतील आमदारांना होता. मध्यप्रदेश विधानसभेत सत्ताधारी भाजपकडे घवघवीत बहुमत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पोटनिवडणूक झाली तरी पुरी (Hardeep Singh Puri) यांचा विजय केवळ औपचारिकताच ठरणार होता.






