Shiv Sena Leader : मोठी बातमी..! शिवसेनेच्या बड्या नेत्यावर कोयत्याने हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ
Shiv Sena Leader : बीड जिल्ह्यातील परळी शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे.

Shiv Sena Leader : बीड जिल्ह्यातील परळी शहरात शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते शिवाजी शिंदे यांच्यावर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धारदार कोयत्याने करण्यात आलेल्या या हल्ल्यात शिवाजी शिंदे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परळीतील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Shiv Sena Leader)
मिळालेल्या माहितीनुसार, परळीतील मोंढा परिसरात असलेल्या त्यांच्या ‘रिद्धी सिद्धी’ हॉटेलमध्ये शिवाजी शिंदे हे पत्नीसोबत उपस्थित होते. त्यावेळी काही तरुणांनी हॉटेलमध्ये घुसून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हातापायांवर गंभीर जखमा झाल्या असून हाताची बोटेही निकामी झाल्याचे त्यांनी सांगितले. (Shiv Sena Leader)
घटनेनंतर शिवाजी शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सुरवसे नावाच्या एका तरुणाशी माझी कोणतीही ओळख नव्हती. मात्र त्याचा आणि माझ्या मुलाचा काही वाद झाला होता. शनिवारी रात्री तो माझ्या गावात घरासमोर आला आणि माझ्या कुटुंबीयांना शिवीगाळ करू लागला. त्यावेळी मी त्याची समजूत काढून त्याला परत पाठवले. (Shiv Sena Leader)
दुसऱ्या दिवशी दुपारी तोच तरुण काही साथीदारांसह माझ्या हॉटेलमध्ये आला आणि अचानक कोयत्याने हल्ला केला. माझ्या हातांवर, पायांवर वार करण्यात आले. माझ्यासोबत असलेल्या पत्नीला देखील मारहाण करण्यात आली, असा आरोप शिवाजी शिंदे यांनी केला. (Shiv Sena Leader)
तसेच हल्लेखोरांनी हॉटेलमधील काही रोकडही लुटल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा हल्ला माझी हत्या करण्यासाठी होता की लुटमारीसाठी, हेच समजत नाही, असेही त्यांनी म्हटले. (Shiv Sena Leader)
दरम्यान, या प्रकरणाचा परळी संभाजीनगर पोलिसांकडून तपास सुरू असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. हल्ल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. (Shiv Sena Leader)





