Suryakumar Yadav PC : वरुण चक्रवर्तीला मिळणार डच्चू? सूर्याने प्लेइंग-११ बाबत राखलं सस्पेन्स; म्हणाला, ‘सगळंच आधी कसं सांगू?
Suryakumar Yadav PC : या मोठ्या लढतीसाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज असून खेळाडूंमध्ये कमालीचा उत्साह असल्याचे त्याने नमूद केले.

Suryakumar Yadav PC ahead IND vs NZ Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या, ८ मार्च रोजी होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या मोठ्या लढतीसाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज असून खेळाडूंमध्ये कमालीचा उत्साह असल्याचे त्याने नमूद केले. मात्र, मोठ्या सामन्यापूर्वी थोडी ‘नर्वसनेस’ असणे स्वाभाविक असल्याचेही त्याने प्रांजळपणे मान्य केले.
दबाव हाच आमचा ‘एक्स फॅक्टर’ –
अंतिम सामन्याच्या दडपणाबद्दल विचारले असता सूर्या म्हणाला, “ज्या सामन्यात दबाव नसतो, तो खेळण्यात मला आणि माझ्या संघाला मजा येत नाही. हाच दबाव खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरित करतो. आमच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत, जे कठीण प्रसंगी शांत राहून निर्णय घेऊ शकतात. दव (Dew) सारख्या गोष्टींवर आमचे नियंत्रण नाही, त्यामुळे आम्ही केवळ आमच्या खेळावर लक्ष केंद्रित करणार आहोत.”
वरुण चक्रवर्तीवर पूर्ण विश्वास –
🚨SURYAKUMAR YADAV REPLY SANTNER STATEMENT.🚨
Q🎙️: Final feelings? And Santner’s “silence the crowd” comment?
Surya🎙️-“Wahi same line bol rahe hain sab, kuch naya bolne do. But honestly, the mood in our camp is very relaxed and happy. 😅 pic.twitter.com/jBo3ytJOMb
— Sam (@Cricsam01) March 7, 2026
फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या फॉर्मबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कर्णधार म्हणाला, “वरुण हा जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवशी प्रत्येक खेळाडू चमकू शकत नाही, पण वरुणला माहित आहे की मोठ्या सामन्यात पुनरागमन कसे करायचे. आम्हाला त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे आणि तो संघाचा महत्त्वाचा भाग आहे.”
प्लेइंग-११ मध्ये बदल होणार? सूर्याचं सूचक स्मितहास्य
अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होणार का? या प्रश्नावर सूर्याने आपल्या खास शैलीत उत्तर दिले. तो हसत म्हणाला, “सगळ्यांना सगळंच आधी जाणून घ्यायचं असतं, पण त्याचं उत्तर तुम्हाला थेट मैदानातच मिळेल. आम्ही परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेऊ.” त्याच्या या विधानामुळे संघात काही ‘सरप्राईज’ बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खेळपट्टीचे स्वरूप: लाल मातीचा प्रभाव –
‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, अंतिम सामन्यासाठी मिश्र मातीची (Mixed Soil) खेळपट्टी वापरली जाणार आहे. यामध्ये काळ्या मातीपेक्षा लाल मातीचे प्रमाण जास्त असेल. याआधी १९ नोव्हेंबर २०२३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये काळ्या मातीची खेळपट्टी वापरली होती. ही माती वेळनुसार संथ (Slow) होते, ज्यामुळे भारतीय फलंदाजांना धावा काढणे कठीण झाले होते. ते ‘जिंक्स’ टाळण्यासाठी यावेळी बदल करण्यात आला आहे.





