IND vs NZ Final Pitch : भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट समोर; बॅट्समनची चंगळ की बॉलर्सचा दबदबा?
IND vs NZ Final Pitch :

IND vs NZ Final Pitch Report Updates : टी-२० विश्वचषक २०२६ च्या जेतेपदासाठी भारत आणि न्यूझीलंड सज्ज झाले आहेत. दोन्ही संघातील हाय-व्होल्टेज सामना ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मात्र, या मैदानावर भारताने आयसीसी स्पर्धेतील दोन महत्त्वाचे सामने गमावले आहेत. ज्यामध्ये २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपची फायनल आणि २०२६ टी-२० वर्ल्ड कपमधील द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याचा समावेश आहे. या ‘अहमदाबाद फोबिया’ला दूर करण्यासाठी फायनलसाठी एक विशेष ‘स्पोर्टिंग पिच’ तयार करण्यात आले आहे.
खेळपट्टीचे स्वरूप: लाल मातीचा प्रभाव –
‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, अंतिम सामन्यासाठी मिश्र मातीची (Mixed Soil) खेळपट्टी वापरली जाणार आहे. यामध्ये काळ्या मातीपेक्षा लाल मातीचे प्रमाण जास्त असेल. याआधी १९ नोव्हेंबर २०२३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये काळ्या मातीची खेळपट्टी वापरली होती. ही माती वेळनुसार संथ (Slow) होते, ज्यामुळे भारतीय फलंदाजांना धावा काढणे कठीण झाले होते. ते ‘जिंक्स’ टाळण्यासाठी यावेळी बदल करण्यात आला आहे.
लाल मातीमुळे खेळपट्टीवर चांगला बाऊन्स मिळेल. चेंडू दोन्ही डावात बॅटवर व्यवस्थित येईल, ज्यामुळे फलंदाजांना मोठे फटके मारणे सोपे होईल. ही एक ‘स्पोर्टिंग पिच’ असेल जिथे गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही आपली कौशल्ये दाखवण्याची संधी मिळेल.
Match-winning catches which secured #TeamIndia‘s place in the #T20WorldCup Final! 👏
Stories Behind Catches, ft. Axar Patel & Fielding Coach T Dilip 💬
Watch 🔽| #MenInBlue | #ENGvIND | @akshar2026 https://t.co/I1ZFDM9vlA
— BCCI (@BCCI) March 7, 2026
बीसीसीआयचा थेट हस्तक्षेप –
स्पर्धेतील सुरुवातीच्या काही सामन्यांमधील संथ खेळपट्ट्यांमुळे भारतीय संघ व्यवस्थापन नाराज होते. त्यामुळे फायनलसाठी सर्वोत्तम दर्जाची खेळपट्टी मिळावी यासाठी बीसीसीआयने (BCCI) आपल्या तज्ज्ञ खेळपट्टी क्युरेटर्सना अहमदाबादला पाठवून तयारीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. दक्षिण आफ्रिकेने याच मैदानावर लाल मातीच्या खेळपट्टीवर २१३ धावा केल्या होत्या, त्यामुळे उद्याही मोठ्या धावसंख्येचा सामना होण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाची ‘अंधश्रद्धा’ की ‘रणनीती’?
केवळ खेळपट्टीच नाही, तर मैदानाबाहेरही संघाने अनेक बदल केले आहेत:
हॉटेल बदलले: २०२३ मध्ये संघ ‘आयटीसी नर्मदा’मध्ये थांबला होता, यावेळी संघाने ‘ताज स्कायलाईन’ हॉटेलची निवड केली आहे.
ड्रेसिंग रूम बदलली: नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी भारत यावेळी ‘होम’ ड्रेसिंग रूमऐवजी ‘व्हिजिटिंग’ ड्रेसिंग रूमचा वापर करू शकतो.





