Suryakumar Yadav : ‘ऑरा फार्मिंग’ ट्रेंडमध्ये सूर्या-श्रेयंकाची धमाल! पण काही वेळातच VIDEO डिलीट केल्याने चर्चांना उधाण

Suryakumar Yadav Aura Farming Video : सोशल मीडियावर गेल्या काही काळापासून ‘ऑरा फार्मिंग’ खूप चर्चेत आहे. या ट्रेंडची सुरुवात एका व्हायरल व्हिडिओपासून झाली, ज्यामध्ये इंडोनेशियाचा ११ वर्षांचा मुलगा रेयान अर्कान बोटीवर उभा राहून नाचताना दिसला होता. आता त्याच्या डान्स स्टेप्सने सर्वांना वेड लावलं आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण या डान्स स्टेप्सची नक्कल करत आहे. या ट्रेंडमध्ये सामील होत सूर्यकुमार यादवने व्हिडीओ शेअर केला होता. मात्र, काही वेळातच त्याने व्हिडीओ डिलीट केल्याने चर्चेत आहे
सूर्यकुमार आणि श्रेयंकाही झाले होते ट्रेंडमध्ये सामील –
भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवही या ट्रेंडमध्ये सामील झाला आहे. त्याने या व्हायरल स्टेपवर नाचताना एक व्हिडिओ शेयर केला होता. या व्हिडिओमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू श्रेयंका पाटीलही दिसली. ती स्लॅड पुशवर बसून बोट चालवल्याचं अभिनय करत होती, तर सूर्यकुमार उभा राहून डान्स करत होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे.
Suryakumar Yadav and Shreyanka Patil reel on Aura Farming trend 👀 pic.twitter.com/SpocItED1U
— Jeet (@JeetN25) July 25, 2025
व्हिडिओ का डिलीट केला?
Suryakumar Yadav ne isi style me video banaya hai kya pic.twitter.com/1GFe1ORnrK
— MRK (@MRK__313) July 25, 2025
सूर्यकुमार यादवने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता, पण काही वेळातच त्याने हा व्हिडिओ का डिलिट केला हे स्पष्ट झालेले नाही. सूर्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि असे रील्स नेहमी शेयर करत असतो. सध्या सूर्यकुमार यादव भारतीय संघाकडून फक्त टी-२० मध्ये खेळतो. आता भारतीय संघ सप्टेंबरमध्ये आशिया कप खेळणार आहे.
ही स्पर्धा टी-२० स्वरूपात खेळवली जाईल आणि टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल. भारत आशिया कपचा गतविजेता आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारत आणि श्रीलंकेच्या यजमानपदाखाली टी-२० विश्वचषकही खेळवला जाणार आहे.





