Suryakumar Yadav : ‘बीवी ने बोला करने का… मतलब करने का’, सूर्याने पत्नीची खास इच्छा केली पूर्ण, पाहा VIDEO

Suryakumar Yadav Share Video Giving POTM Trophy to Wife : सूर्यकुमार यादवच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ५९ धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई संघाने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. वानखेडे स्टेडियमवर सूर्यकुमार यादवने ७३ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या खेळीत त्याने ४३ चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये ९ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.
सूर्यकुमार यादवने सांगितली खास गोष्ट –
सूर्यकुमार यादवला त्याच्या दमदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. यानंतर त्याने पत्नीसोबतचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्याला सामन्यापूर्वी त्याच्या पत्नीने सांगितलं होतं की, तू गेल्या सामन्यांमध्ये सर्व पुरस्कार जिंकले आहेस, पण सामनावीराचा पुरस्कार जिंकला नाहीस. यानंतर सूर्याने त्याच सामन्यात उत्कृष्ट खेळी करत सामनावीराचा पुरस्कार जिंकला. हा पुरस्कार जिंकल्यानंतर या एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो हा पुरस्कार आपल्या पत्नीला देताना दिसत आहे.
आजचा हा पुरस्कार माझ्यासाठी खास – सूर्यकुमार यादव
View this post on Instagram
सामनावीर म्हणून निवड झाल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला, “आता १३ सामने झाले आहेत. आज माझ्या पत्नीने मला एक गोड गोष्ट सांगितली. ती म्हणाली की, तू मॅन ऑफ द मॅच वगळता सगळे पुरस्कार जिंकले आहेस. त्यामुळे आजचा हा पुरस्कार माझ्यासाठी खास आहे. संघाच्या दृष्टिकोनातून ही खेळी महत्त्वाची होती आणि ही ट्रॉफी तिच्यासाठी (पत्नी) आहे. ती अशा क्षणांची वाट पाहत असते. त्यामुळे आम्ही अशा खास क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी आतुरतेने वाट पाहतो.”
हेही वाचा – IPL 2025 : आरसीबीचा प्लेऑफपूर्वी मास्टर स्ट्रोक! ‘या’ धडाकेबाज फलंदाजाला संघात केलं सामील
तो सामन्याचा एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट होता – सूर्यकुमार यादव
सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला, “एक फलंदाज म्हणून शेवटपर्यंत फलंदाजी करणे महत्त्वाचे होते. आम्हाला माहित होते की कोणते तरी १५-२० धावांचे एक षटक येईल. त्यामुळे शेवटपर्यंत टिकून राहणे गरजेचे होते. नमनने येताच ज्या प्रकारे फटकेबाजी करत महत्त्वाची भागीदारी केली. तो देखील या सामन्याचा एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट होता.”





