Suryakumar Yadav Gesture : ‘चेता को डिस्टर्ब मत करु…!’ तिरुवनंतपुरममध्ये सूर्याने संजूला दिला खास सन्मान, पाहा VIDEO
Suryakumar Yadav Gesture : तिरुवनंतपुरममध्ये सूर्याने संजू सॅमसनला खास सन्मान दिल्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Suryakumar Yadav gesture for Sanju Samson Kerala : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ केरळमध्ये दाखल झाला असून, स्थानिक स्टार खेळाडू संजू सॅमसनचे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादवने दाखवलेल्या एका खास कृतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सूर्याची ‘ती’ कृती आणि संजूला दिलेला मान –
भारतीय संघ विमानतळावरून बसकडे जात असताना चाहत्यांनी ‘संजू-संजू’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. यावेळी सूर्यकुमार यादव संजूच्या खांद्यावर हात ठेवून चालत होता. कॅप्टन सूर्याने हसत प्रेक्षकांना उद्देशून म्हटले, “चेता (मोठ्या भावाला) को डिस्टर्ब मत करु” आणि त्याने हात पुढे करून संजूला पुढे चालण्याची विनंती केली. संजूनेही हसून सूर्याचा हा मान स्वीकारला. बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये संजूने आपल्या ‘गॉड्स ओन कंट्री’मध्ये परतल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
फॉर्म चिंतेचा विषय; सॅमसनवर टीकेची झोड –
Make way for @IamSanjuSamson in 𝗚𝗼𝗱’𝘀 𝗼𝘄𝗻 𝗰𝗼𝘂𝗻𝘁𝗿𝘆 😉
🎥 Don’t miss this banter between friends Sanju Samson and Captain Surya Kumar Yadav 😄#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFirstBank | @surya_14kumar pic.twitter.com/zBAFPmZJGk
— BCCI (@BCCI) January 30, 2026
टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या संघात शुबमन गिलऐवजी सलामीवीर म्हणून स्थान मिळालेला संजू सॅमसन या मालिकेत पूर्णपणे अपयशी ठरला आहे. मागील ४ सामन्यांची धावसंख्या १०, ६, ० आणि २४ अशी राहिली आहे. विशाखापट्टणम येथील चौथ्या सामन्यात संजूला चांगली सुरुवात मिळाली होती, पण २४ धावांवर त्याने आपली विकेट फेकली. सातत्यपूर्ण खराब कामगिरीमुळे सध्या सोशल मीडियावर संजूवर टीका होत आहे.
घरच्या मैदानात ‘शेवटची संधी’?
सूर्यकुमार यादवकडून संजू सॅमसनला व्हीआयपीए ट्रिटमेंट
तिरुवनंतपुरम हे संजू सॅमसनचे घरचे मैदान आहे. भारताने मालिका आधीच जिंकली असली तरी, संजूसाठी हा सामना ‘करो या मरो’ असा असू शकतो. जर या सामन्यातही संजू मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला, तर आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचे स्थान धोक्यात येऊ शकते. त्यामुळे घरच्या प्रेक्षकांसमोर संजूची ‘बॅट’ तळपणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





