IND vs SA : संजू सॅमसनचा कडक स्ट्रेट ड्राइव्ह, पण चेंडू अंपायरला लागला अन् सामनाच थांबला, पाहा VIDEO

Sanju Samson hit Umpire during IND vs SA 5th T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना तिलक आणि हार्दिकच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेसमोर २३२ धावांचे भले मोठे लक्ष्य ठेवले आहे, दरम्यान या सामन्यात एक धक्कादायक घटना घडली.
नेमकं घडलं काय?
संजू सॅमसनने मारलेला वेगवान चेंडू थेट पंचांच्या गुडघ्यावर जाऊन आदळला, ज्यामुळे पंचांना गंभीर दुखापत झाली आणि काही काळ खेळ थांबवावा लागला. ही घटना भारतीय डावाच्या नवव्या षटकात घडली. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू फरेरा गोलंदाजी करत होता. षटकातील चौथ्या चेंडूवर संजू सॅमसनने समोरच्या दिशेने जोरदार ‘स्ट्रेट ड्राइव्ह’ मारला. गोलंदाज फरेराने झेल घेण्याचा प्रयत्न केला.
Sanju Samson ಬಾರಿಸಿದ ಹೊಡೆತಕ್ಕೆ Umpire ಫೆಲ್ ಡೌನ್!👀
📺 ವೀಕ್ಷಿಸಿ | #INDvSA 👉 5th T20I | LIVE NOW | ನಿಮ್ಮ Star Sports ಕನ್ನಡ & JioHotstar ನಲ್ಲಿ.#TeamIndia pic.twitter.com/lDjr7gtuhD
— Star Sports Kannada (@StarSportsKan) December 19, 2025
पंच रोहन पंडित यांच्या गुडघ्यावर लागला चेंडू –
पण चेंडू त्याच्या हाताला लागून वेगाने समोर उभ्या असलेल्या पंच रोहन पंडित यांच्या गुडघ्यावर आदळला. चेंडू लागताच रोहन पंडित वेदनेने मैदानावर कोसळले. हे पाहून संजू सॅमसन आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू तातडीने त्यांच्या मदतीला धावले. दक्षिण आफ्रिकेच्या फिजिओनी मैदानावर येऊन पंचांच्या गुडघ्यावर ‘मॅजिक स्प्रे’ मारला आणि उपचार केले. काही मिनिटांच्या विश्रांतीनंतर पंच पुन्हा उभे राहिले आणि सामना पुन्हा सुरू झाला.
हेही वाचा – AUS vs ENG : ‘हे तंत्रज्ञान काढून टाका!’, स्निकोमीटरच्या चुकीच्या निर्णयामुळे मिचेल स्टार्क संतापला
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीने भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. अभिषेकने ३४ धावांचे योगदान दिले. संजू सॅमसननेही लय पकडली होती, मात्र पंचांना चेंडू लागल्याच्या घटनेनंतर पुढच्याच षटकात तो बाद झाला. जॉर्ज लिंडेने संजूला क्लीन बोल्ड केले. बाद होण्यापूर्वी संजूने २२ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३७ धावांची खेळी केली.





