Bigg Boss Marathi 5: कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये दिसला सूरजचा ‘गोलीगत पॅटर्न’

Bigg Boss Marathi Season 5 | एकाच वेळी लाखो लोकांशी आपल्या बोबड्या भाषेत संवाद साधणारा आणि तमाम लोकांना आपल्या “गोलीगत..’ आणि “बुक्कीत टेंगुळ’ या प्रसिद्ध डायलॉगने आनंद देणारा टिकटॉक स्टार ‘सुरज चव्हाण’ मराठी बिग बॉस ५ मधून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
घरात सुरज आपल्या प्रामाणिक स्वभावाने प्रेक्षकांची मन जिंकत आहे. नुकताच झालेल्या एपिसोडमध्ये घराचा कॅप्टनवरून पुन्हा एकदा सूरज चर्चेत आला आहे. टास्कमध्ये सूरजचे अँग्री मॅन रुप दिसणार आहे.
सूरज हा थेट थेट अरबाजला नडला आहे. घराचा कॅप्टन होण्यासाठी दिलेल्या टास्कमध्ये सूरज चव्हाण आपला गोळीगत पॅटर्न दाखवला आहे. प्रोमोमध्ये “माझं मी बघेन”, म्हणत निक्की, अरबाज आणि जान्हवी या तगड्या सदस्यांसोबत सूरज चांगलाच भिडताना दिसत आहे.
View this post on Instagram
एपिसोडमध्ये कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये जान्हवी, योगिता, निखिल, घन:श्याम, अरबाज, निक्की, आणि सूरज यांचा ग्रुप विजयी झाला. त्यामुळे या गटातील सात जण हे कॅप्टन पदाचे उमेदवार झाले.
कॅप्टन ठरवण्यासाठी बिग बॉसने एक टास्क दिला आहे. आणि टास्क पूर्ण करताना युक्ती आणि शक्तीचा वापर होणार आहे. कॅप्टन्सीचा हा टास्क पूर्ण होत असताना दुसरीकडे पराभूत झालेला ग्रुप आता गॅलरीत बसणार आहे.
कॅप्टन्सीच्या या टास्कचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. या प्रोमो व्हिडीओत गॅलरीत असलेला सूरज हा मी त्याला मारलं नसल्याचे सांगतो. तसेच वैभव हा सूरजला तू असे हातपाय करू नकोस असे म्हणतो. मात्र वैभवलाही सुरज चांगलाच सडेतोड उत्तर देतो.
वैभवच्या बोलण्यावर चिडलेला सूरज माझं मी बघेन असे सांगतो. सूरज हा थेट अरबाजला भिडताना दिसत आहे. कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये सुस्साट सुटलेला सूरज कोणालाही आवरला नसल्याचे दिसून आले. सूरजच्या या गोळीगत अवताराने जान्हवी आणि निक्कीदेखील घाबरल्याचे प्रोमोत दिसून आले.
सोशल मीडियावर या दरम्यानचा प्रोमो चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते त्याच्या या ‘गोळीगत पॅटर्न’ चे कौतुक करत आहे. सोशल मीडियावर सुरजचे चाहत्यांचा लाखोंचा घरात आहे. त्याला चाहत्यासोबतच सेलेब्सचाही प्रचंड पाठिंबा आहे.





