…अन् सलमान खान चिडला

Bollywood news | जया बच्चन नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. जावेद अख्तर आणि सलीम खान यांच्या जोडीबद्दलही जया बच्चन यांनी नुकतेच एक विधान केले यावरून आता सलमान खानला चिडला आहे.
अलीकडेच ‘अँग्री यंग मॅन’ या माहितीपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला होता, ज्याच्या शेवटी एक व्हिडिओ दाखवण्यात आला होता. ज्यामध्ये जया सलीम आणि जावेदला वाईट आणि बिघडलेले म्हणताना दिसत होत्या. यावर भाईजानने प्रतिक्रिया देत नाराजीही व्यक्त केली.
वडिलांसोबत काम करू न शकलेल्या कलाकारांनी त्यांना बिघडलेले आणि वाईट वागणूक देण्यास सुरुवात केली, असे सलमानने सांगितले. सलीमला वेडा आहे.असेही ते माझ्या वडिलांना म्हणू लागले. असे म्हणणारे लोक स्वःताहाच वेडे असल्याचे सलमान म्हणाला.
सलमान म्हणाला की,’लोक त्याच्या वडिलांसोबत काम करू शकले नाहीत, कारण त्याच्याकडे तारखा नाहीत, त्यांना कथानक आवडले नाही किंवा त्यांना त्याचा चेहरा आणि व्यक्तिरेखा आवडले नाही, कारण काहीही असो. पण ते लोक वडिलांना सांगू लागले की ते मानसिक आजारी आहे, पण असे म्हणणारे ते स्वःताच मानसिक आजारी आहेत.
सलमानने असेही सांगितले की त्याचे वडील आणि जावेद एकामागून एक हिट चित्रपट लिहित होते आणि म्हणूनच त्यांनी अनेक निर्माते आणि अभिनेत्यांना नकार दिला. यामुळे लोक त्यांना वेगवेगळे टॅग देऊ लागले.





